नांदगाव : पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून, शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मुंबई झोपडपट्टी पुनर्वसन अधिकारी बाजीराव शिंदे यांनी केले. बाजीराव शिंदे व सहकारी अर्जुन शिंदे यांनी श्रीक्षेत्र शनैश्वर देवस्थान नस्तनपूर येथे शनिदेवाचे दर्शन घेऊन जातेगाव ग्रामपालिकेला भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत लक्ष्मीनगरचे उपसरपंच, चंद्रकांत भालेराव, सचिन बैरागी होते. त्यांनी येथील यावेळी सरपंच बंडू पाटील यांनी कामे करण्यासाठी निधीच्या अपूर्ततेमुळे कामे योग्य प्रकारे होत नाही, असे मत प्रदर्शित केले. यावेळी झालेल्या चर्चेत राजेंद्र लाठे, नामदेव वर्पे, अरु ण हिंगमिरे हे सहभागी झाले. अशोक जाधव, रमेश पाटील, बाळू पाटील, रामचंद्र पवार, सोपान खिरडकर हे उपस्थित होते. कर्ज वसुलीबाबत चर्चा ग्रामदैवत पिनाकेश्वर महादेव देवस्थानच्या विकासकामाबाबत येथील पाणीपुरवठा योजनेबाबत तसेच इतर विकासकामांबाबत विविध कार्यकारी सेवा सोसायटीने वाटप केलेल्या कर्ज व वसुलीबाबत चर्चा केली. पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाच्या निधीवर अवलंबून न राहता लोक वर्गणीतून नद्यांचे खोलीकरण करून पाणी अडवा, पाणी जिरवा यासह इतर जलसंधारणाची कामे करण्याबाबत मार्गदर्शन केले.
लोकसहभागातून पाणीप्रश्न सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:36 PM