नाशिक : दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या सूरमयी केली.निमित्त होते, शहरातील हौशी गायकांच्या ‘ए एन कराओके क्लब’च्या वतीने कुसुमाग्रज स्मारकात आयोजित ‘लताशा’ या मैफलीचे. शनिवारी (दि.१३) विशाखा सभागृहात मैफलीचा प्रारंभ गायक अनिता खर्डे यांनी लतादीदींच्या आवाजातील रुदाली चित्रपटातील दिल हुम-हुम करे... या गीताने केली. त्यानंतर नीलिमा साठे यांनी आशाजींच्या सुमधुर आवाजातील आओ हुजूर तुमको इशारो में... या गीताचे सादरीकरण करत उपस्थितांचा उत्साह वाढविला. मैफलीच्या अखेरीस अंजली चव्हाण व अशोक झोपे यांनी सादर केलेल्या कितना प्यारा वादा हैं.... या गीताला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. निवेदक प्रवीण पोतदार यांनी खास शैलीत लतादीदी, आशा भोसले यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकत मैफलीत रंग भरला.स्नेहल कुलकर्णी व जयंत चांदवडकर यांनी गुम हैं किसीके प्यार में..., उर्मिला शिंदे यांनी कभी कभी मेरे दिल में..., मेधा सोनवणे-अविनाश येवलेकर यांनी कश्मीर की कली चित्रपटातील गाजलेले गीत दिवाना हुवा बादल..., कल्पना पवार यांनी तेरा मेरा प्यार अमर..., वृषाली गोळेसर यांनी बेदर्दी बालमा तुझको... या गीताला सुरुवात करताच सभागृहातून टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला.सपना पहाडे-नितीन परेवाल यांनी निंद ना मुझको आयें..., दीपाली शिरसाठ यांनी दिल दिवाना बिन सजना कें... हे गीत सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. अशा एकापेक्षा एक सरस हिंदी गाण्यांनी मैफल उत्तरोत्तर खुलत गेली.
कभी कभी मेरे दिल में...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:48 AM
दिवाना हुवा बादल..., तेरा मेरा प्यार अमर..., देखा मैने देखा एक सपना..., हमने सनम को खत लिखा..., एक प्यार का नगमा हैं... अशा एकापेक्षा एक सरस गाजलेल्या हिंदी चित्रपटांमधील लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्या आवाजातील गीतांच्या गायनाने नाशिककरांची संध्या सूरमयी केली.
ठळक मुद्दे‘लताशा’ ; हौशी गायकांच्या सुमधुर आवाजाने रंगली मैफल