सिन्नर : तालुक्यातील श्रीरामपूर (शिंदेवाडी) येथील विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ सूर्यभान हांडोरे यांची, तर उपाध्यक्षपदी राहीबाई पोपट जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विकास संस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक अडीच वर्षांपूर्वी झाली. त्यावेळी अध्यक्षपदी नवनाथ खाडे व उपाध्यक्षपदी सोपान हांडोरे यांची निवड करण्यात आली होती. मात्र सहकारी संचालकांना संधी मिळावी यासाठी खाडे व हांडोरे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे संस्थेचे नूतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती. निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाºयांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बाबू कणकुसे, नितीन कोकाटे, भावगीर गोसावी, अलका हांडोरे या संचालकांसह माजी उपसरपंच सुभाष हांडोरे, तंटामुक्तीचे अध्यक्ष अशोक हांडोरे, संदीप हांडोरे, भारत खाडे, शांताराम कोकाटे, किसन खाडे, केशव हांडोरे, सुकदेव जाधव, दिलीप हांडोरे, वाल्मीक हांडोरे, प्रभाकर कोकाटे, मच्छिंद्र घोटेकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थेचे सचिव सुनील कासार यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदासाठी सोमनाथ हांडोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून परशराम हांडोरे यांनी, तर अनुमोदक म्हणून लक्ष्मण हांडोरे यांनी स्वाक्षरी केली. उपाध्यक्षपदासाठीच्या राहीबाई जाधव यांच्या अर्जावर दत्तू खाडे यांनी सूचक म्हणून, तर चिंतामण खाडे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली. दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकएकच अर्ज आल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
श्रीरामपूर विकास संस्थेच्या अध्यक्षपदी सोमनाथ हांडोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2018 12:09 AM