अर्ज दाखल करण्याच्या निर्धारित वेळेत सरपंचपदासाठी निकम यांचाच एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यास सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य सुभाष नहिरे होते. यानंतर, विशेष सभेत निकम यांची सरपंच म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बैठकीस उपसरपंच अविनाश निकम, सदस्य आशाबाई निकम, दादाजी सुपारे, संगीता निकम, सुरेखा मानकर, शरद देवरे, भावना निकम, विशाल निकम, अक्काबाई सोनवणे, विद्या निकम, अंताजी सोनवणे, सुनीता गायकवाड आदी १४ सदस्य हजर होते, तर तीन सदस्य गैरहजर होते. निकम यांच्या निवडीची घोषणा होताच, समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी नवनिर्वाचित सरपंच निकम यांची ग्रामपंचायत कार्यालयापासून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास निकम यांनी पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी प्रमोद निकम, भिकन निकम, निळकंठ निकम, डॉ.एस.के. पाटील, सुभाष निकम, राजाराम निकम, कारभारी निकम, बाळू निकम, निरंकार निकम, यशवंत निकम, रावसाहेब निकम, रवींद्र निकम, माजी सरपंच नंदू पवार, हरिदादा निकम, अमोल निकम, सुनील पाटील, नानाभाई निकम, डॉ.संदीप पाटील, काकाजी निकम आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेसाठी ग्रामविकास अधिकारी बी.एन. पाटील, तलाठी पंकज पगार, यशवंत निकम, कोतवाल बापू अहिरे उपस्थित होते.
फोटो - १४ दाभाडी सरपंच
दाभाडीच्या सरपंचपदी सोनाली निकम यांनी निवड झाल्यानंतर, त्यांचे स्वागत करताना ग्रामपंचायत सदस्य.
===Photopath===
140621\14nsk_9_14062021_13.jpg
===Caption===
दाभाडीच्या सरपंचपदी सोनाली निकम यांनी निवड झाल्यानंतर त्यांचे स्वागत करताना ग्रामपंचायत सदस्य.