सभेचे कामकाज माजी चेअरमन राधाकिसन हाडपे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव कदम, सहा.सचिव अरुण कदम, राजेंद्र गांगुर्डे यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी संचालक गणपत हाडपे यांनी प्रास्ताविक करून सोमनाथ चिंधू सोनवणे यांच्या नावाची सूचना आणली, तर त्या सूचनेस संचालिका जनाबाई नागरे यांच्या वतीने दगुजी नागरे यांनी अनुमोदन दिले. यावेळी एकच अर्ज आल्याने सभेचे अध्यक्षांनी सोमनाथ सोनवणे हे बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर केले. यावेळी आतषबाजी करून गुलालाची उधळण करण्यात आली,
यावेळी व्हॉइस चेअरमन शारदा सोनवणे, भास्करराव सोनवणे, सोमनाथ नागरे, दगुजी नागरे, एकनाथ नागरे, सरपंच पंडितराव सोनवणे, सुभाषराव नागरे, प्रकाश साळवे, सोमनाथ सोनवणे, छबुराव हाडपे, सोमनाथ हाडपे, शरद हाडपे, अनिल हाडपे, पर्वत सोनवणे, राजू सोनवणे, संदीप सानप, सुरेश बोडके, कारभारी दौड, सुरेश सोनवणे, दिलीप सोनवणे, मारुती सोनवणे, सनी हाडपे, रमेश सोनवणे, प्रदीप सोनवणे, ह.भ.प. सागर दौड, मेजर भाऊराव सोनवणे, बबन सोनवणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते,
फोटो - ०५ मांजरगाव सोसायटी
मांजरगाव विविध कार्यकारी सेवा सहसंस्थेच्या चेअरमनपदी सोमनाथ सोनवणे यांच्या निवडीप्रसंगी सभासद व संचालक.
===Photopath===
051220\05nsk_20_05122020_13.jpg
===Caption===
मांजरगाव विविध कार्यकारी सेवा सह संस्थेच्या चेअरमन पदी सोमनाथ सोनवणे यांच्या निवडी प्रसंगी सभासद व संचालक