शहरं
Join us  
Trending Stories
1
हरयाणात BJP, जम्मू-काश्मिरात इंडिया; महाराष्ट्रात काय होणार? महायुती-मविआत कोणाचा दबाव वाढेल?
2
हरयाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडणार; भाजपच्या जल्लोष सभेत देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
3
अखेर ठरले... अजित पवार बारामतीतूनच लढणार; प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केली उमेदवारी
4
जम्मू-काश्मीरमध्ये 'इंडिया', ओमर अब्दुल्ला होणार मुख्यमंत्री; आपनेही खाते उघडले
5
हरयाणात भाजपची हॅट्ट्रिक; काँग्रेसच्या पाच जागा वाढल्या, पण बहुमताची हुलकावणी
6
मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करा; उद्धव ठाकरे यांचे काँग्रेस, शरद पवार गटाला आवाहन
7
ओमर हेच मुख्यमंत्री, वाटेकरी कुणीच नाही; फारूख अब्दुल्लांनी केले जाहीर, काँग्रेसचे ६ विजयी
8
०.८५ टक्के कमी मते अन् गमावल्या ११ जागा; भाजप-काँग्रेसच्या मतांची टक्केवारी जवळपास सारखीच
9
जम्मू-काश्मीर विधानसभा निकालात ‘इंडिया’ने मारली बाजी, तरी भाजप ठरला बाजीगर
10
हरयाणामध्ये भाजप जिंकण्यामागचे गणित काय? काँग्रेसच्या हातात असलेला विजय हिसकावला
11
मागासवर्गीय मतदारांनी काँग्रेसकडे फिरविली पाठ; हरयाणात जाट-बिगर जाट मतांचे ध्रुवीकरण
12
काँग्रेसच्या मनोबलावर परिणाम होणार नाही; हरयाणा निकालावर रमेश चेन्नीथलांचे मत
13
बहिणीच्या दसरा मेळाव्याला भाऊ उपस्थित राहणार का? पंकजा, धनंजय मुंडे महायुतीत असल्याने चर्चा
14
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
15
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
16
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
17
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
18
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
19
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
20
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी

औद्योगिक वसाहतीच्या भूखंडांचे लवकरच वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:28 AM

गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रखडलेली जिल्हा उद्योगमित्र अर्थात झुमच्या बैठकीला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्ह्यातील सायने, मालेगाव क्लस्टर आणि दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्या टप्प्यातील २२ भूखंडांचे वाटपाबाबत पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन ते वितरित करण्याबाबत निर्णय घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांनी दिला.

नाशिक : गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून रखडलेली जिल्हा उद्योगमित्र अर्थात झुमच्या बैठकीला अखेर मंगळवारी मुहूर्त लागला. उद्योजकांच्या विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा होऊन जिल्ह्यातील सायने, मालेगाव क्लस्टर आणि दिंडोरी तालुक्यातील अक्राळे येथे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून विकसित होणाऱ्या औद्योगिक वसाहतीतील पहिल्या टप्प्यातील २२ भूखंडांचे वाटपाबाबत पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेऊन ते वितरित करण्याबाबत निर्णय घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी राधाकृष्णन् यांनी दिला.  जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीत दिंडोरीतील अक्राळे येथील औद्योगिक वसाहतीमधील ३७२ पैकी २५६ एकर जागा ताब्यात घेण्यात आली आहे. तर ६५ एकर जमिनीचा प्रश्न मंत्रालयात प्रलंबित आहे. परंतु पहिल्या टप्प्यातील ७२ पैकी २२ भूखंडांचे वितरण करता येणे शक्य आहे. तर एमआयडीसीचे अभियंता दुष्यंत उईके यांनी पाणीपुरवठ्याअभावी भूखंडांचे वितरण रखडल्याचे सांगितले. त्यावर जिल्हाधिकाºयांनी याबाबत मंत्रालयाशी बोलून पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवून भूखंडांचे लवकरात लवकर कसे वितरण करता येईल, याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. अंबड औद्योगिक क्षेत्रात फायर स्टेशन केंद्रांचे बांधकाम पूर्णत्वास करण्यात आले आहे. एमआयडीसीने अंबड औद्योगिक क्षेत्रात बांधण्यात आलेल्या गाळे प्रकल्पातील वाटपाकरिता तयार असून, भूखंडांचे दर निश्चितीबाबत मुख्यालय स्तरावरून येत्या १५ दिवसांत निर्णय घेणार असल्याचे हेमांगी पाटील यांनी स्पष्ट केले. तर या गाळ्याचे भाव ५ हजार रुपये प्रतिस्क्वेअर फूट ठरविण्यात आले होते. परंतु हे दर कमी करण्याची मागणी निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांनी केली. त्यावर तत्काळ योग्य तो निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी स्पष्ट केले. औद्योगिक परिसरात कचरा उचलण्यासाठी अंबड परिसरात दोन घंटा गाड्या व सातपूर औद्योगिक परिसरात दोन घंटा गाड्या उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले.सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीमधील मनपाने उभारलेल्या पथदीपांची दुरुस्ती मनपाच्या विद्युत विभागातर्फे सुरू असल्याचे मनपाच्या विद्युत विभागाच्या प्रतिनिधींनी स्पष्ट केले. पाटणकर यांनी शासनाने एलबीटी बंद केलेला असल्याने खरेदी-विक्रीचे व्यवहार करताना नोंदणी कार्यालयाकडून एक टक्का कर वसूल करण्यात येतो व हा कर महानगरपालिकेकडे जमा होतो. सदरच्या कर नगरविकास मंत्रालयातून लावण्यात आलेला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीत जिल्ह्यातील ३४ औद्योगिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक पी. डी. रेंदाळकर, उद्योजक मनीष रावल, महापालिकेचे अधीक्षक अभियंता संजय घुगे, कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे यांच्यासह विद्युत, परिवहन महामंडळासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.दर महिन्याला होणार झुमची बैठकदोन वर्षांपूर्वी झुमची बैठक दर महिन्याला घेण्यात येत होती, त्याचप्रमाणे आता दर महिन्याला दुसºया मंगळवारी किंवा बुधवारी झुमची बैठक घेण्याची मागणी उद्योजक रमेश पवार यांनी केली. तर बैठकीत उद्योजकांच्या प्रशासनाकडे काही समस्या सोडविणे, उद्योजकांना कर्ज मिळणे, उद्योजकांना प्लॉट उपलब्ध करून देणे यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयावर बैठक होणार असेल तर दर महिन्याला बैठक घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी यांनी दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसी