नाशिक- महापालिकेच्या पोटनिवडणूकीची प्रक्रीया थांबली असली तरी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. नाशिक महापालकेच्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या सहा प्रभाग समित्या असून मार्च अखेरीस या समित्यांच्या सभापतिपदाची मुदत संपणार आहे. खरे तर गेल्या वर्षी विलबांने निवडणूका झाल्याने आता ऑक्टोबर महिन्यात निवडणूका होतील अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, सभापतिपदाची मुदत ३१ मार्च रोजीच संपणार असल्याने आता या निवडणूकीसाठी प्रशासनाने विभागीय आयुक्तांना प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे विभागीय आयुक्त वेळापत्रक कधी जाहीर करतात याकडे लक्ष लागून आहे.एकूण सहा प्रभाग समित्यांपैकी भाजप, सेना, मनसेला प्रत्येकी दोन समित्या मिळण्याची शक्यता आहे. तथापि, अखेरचे वर्ष असल्याने अनेक समित्यांमध्ये सदस्यांची फाटाफुट होण्याची शक्यता आहे.
प्रभाग समिती सभापतिपदाच्या लवकरच निवडणूका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 11:44 PM
नाशिक- महापालिकेच्या पोटनिवडणूकीची प्रक्रीया थांबली असली तरी प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणूका घेण्यासाठी प्रशासनाने तयारी केली असून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवण्यात आला आहे. नाशिक महापालकेच्या पूर्व, पश्चिम, सिडको, सातपूर, पंचवटी, नाशिकरोड या सहा प्रभाग समित्या असून मार्च अखेरीस या समित्यांच्या सभापतिपदाची मुदत संपणार आहे.
ठळक मुद्देआयुक्त वेळापत्रक कधी जाहीर करतात याकडे लक्ष