योगासन स्पर्धेतील यशस्वी आत्मा मालिक शाळेतील विद्यार्थ्यांसमवेत प्रविण घोगरे, हनुमंत भोंगळे, रामभाऊ झांबरे, राजेश पाटील आदी.येवला : तालुक्यातील पुरणगाव येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम आण िज्युनिअर कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांनी शालेय विभागीय स्तरावर योगासन स्पर्धेत यश संपादन केले आहे.१४ वयोवर्ष गटातील मुले व मुली , कांचन एकनाथ पाडवी (अिर्टिस्टक दुतीय क्र मांक) , मोहीत गवळी रीदमिक योगा ( तृतीय ) , योगेश भोडवे अर्टीस्टीक ( तृतीय ) , १७ वयोवर्ष गटातील मुले रेदमिक योगा , रितेश जाधव (दुसरा ) १९वयोवर्ष गटातील मुले व अनिकेत जाधव (तृतीय ), जय मुटेकर(साÞघिक तृतीय ) या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. जय मुटेकर या विद्यार्थ्यांची शालेय राज्यस्तरीय योगासन स्पर्धे साठी निवड झाली आहे.यशस्वी खेळाडूना योगा प्रशिक्षक प्रविण घोगरे यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंना अध्यक्षहनुमंत भोंगळे, संत सेवादासमहारज, उपाध्यक्ष रामभाऊ झांबरे, प्राचार्य राजेश पाटील व योगेश सोनवणे, संकुलप्रमुख प्रकाशभांबरे, प्रमोद शेलार, तेजस राऊत,क्र ीडा शिक्षक प्रवीण घोगरे,योगेश गागुर्डे ,ऋतिक भाबड ,अमोल आहेर आदी यांनी त्यांचा सत्कार केला.
योगासन स्पर्धेत आत्मा मालिक शाळेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 6:31 PM