नाशिक : करमूल्य निश्चितीच्या निर्णयाला विरोध दर्शवून महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे महापौर व नगरसेवकांकडून आचारसंहिता भंग झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचलेल्या प्रशासनाने यासंदर्भात महापालिकेने सुपूर्द केलेल्या महासभेतील ध्वनिचित्रफितीचे अवलोकन युद्धपातळीवर सुरू केले आहे. सुमारे साडेनऊ तास चाललेल्या या महासभेत प्रत्येक नगरसेवकाने व्यक्त केलेले मत व सूचनांचा विचार करून तसे कारण त्यांना बजावण्यात येणाऱ्या नोटिसीत नमूद करण्यात येणार आहे. यासंदर्भात गुरुवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच महापालिकेच्या नगरसेवकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. वरकरणी नगरसेवकांनी महासभेत करमूल्य निश्चितीच्या निर्णयावर निव्वळ सूचना केल्या असल्या तरी, त्यामुळेच महापौरांना त्याची दखल घेत त्या निर्णयाला स्थगिती देण्याची घोषणा करावी लागली आहे. याचा विचार करता ही बाब आचारसंहितेचा भंग कशी ठरू शकते, असा सवाल आता नगरसेवक करीत असून, गुरुवारी त्यांनी नाशिक महापालिकेच्या काही वरिष्ठ अधिकाºयांकडून याबाबतची माहिती जाणून घेतानाचा जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांशी संपर्क साधून त्याबाबतची खात्री केली आहे.जिल्हाधिकाºयांकडून महासभेची अनुमती घेऊनच सभा घेण्यात आली असल्याचा दावादेखील आता केला जात आहे, त्यामुळे महासभेने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही, असा युक्तिवाद करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काही नगरसेवकांनी संदर्भातील कायद्याच्या तरतुदी पडताळून पाहण्यास सुरुवात केली आहे. दुसरीकडे महापालिकेने महासभेतील निर्णय व त्याच्या पुराव्यादाखल महासभेचे चित्रीकरण करणारी सीडी जिल्हा प्रशासनाला सुपूर्द केल्याने उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी त्याचे अवलोकन करीत आहे.नोटीस देण्याची तयारीतब्बल साडेनऊ तास चाललेल्या या महासभेत कोणत्या सदस्याने काय मत व सूचना व्यक्त केली ते त्याच्या नावानिशी नमूद करण्याचे काम सुरू झाले असून, प्रत्येक सदस्याला त्याने महासभेत बजावलेल्या भूमिकेशी सुसंगत अशी नोटीस देण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे या कार्यवाहीला आणखी काही दिवस लागण्याची शक्यताही सूत्रांनी व्यक्त केली असली तरी तूर्त महापालिकेचे ८७ नगरसेवक या कृत्यामुळे चांगलेच धास्तावले आहेत.
ध्वनिचित्रफितीचे अवलोकन : कायदेशीर चाचपणी आचारसंहितेच्या नावाने नगरसेवक धास्तावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 1:32 AM
नाशिक : करमूल्य निश्चितीच्या निर्णयाला विरोध दर्शवून महापालिकेच्या महासभेत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला स्थगिती देण्याच्या निर्णयामुळे महापौर व नगरसेवकांकडून आचारसंहिता भंग झाल्याच्या निष्कर्षाप्रत पोहोचलेल्या प्रशासनाने यासंदर्भात महापालिकेने सुपूर्द केलेल्या महासभेतील ध्वनिचित्रफितीचे अवलोकन युद्धपातळीवर सुरू केले आहे.
ठळक मुद्देकारण त्यांना बजावण्यात येणाऱ्या नोटिसीत नमूद करण्यात येणार जिल्हा प्रशासनातील अधिकाºयांशी संपर्क साधून त्याबाबतची खात्री केली