नाशिक: महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी (दि.२७) आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. शहरविकासाच्या दृष्टीने आवश्यक ते प्रकल्प समन्वयातून पुढे नेण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान, राधाकृष्ण गमे मात्र,नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांची बुधवारी (दि.२६) यांची बदली झाल्यानंतर जाधव हे शुक्रवारी (दि.२८) कार्यभार स्वीकारणार असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, प्रत्यक्षात अगोदरच त्यांनी येऊन कार्यभार स्वीकारला. शहरात अनेक प्रकल्प सध्या सुरू आहेत. ते वेगाने पूर्र्ण करण्यावर भर देताना आता सर्वाधिक महत्व आरोग्य विषयाला द्यावे लागत आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विषयक कामांना प्राधान्य दिले जाईल असे सांगतानाच जाधव यांनी मावळते आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्यापेक्षा ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांनी केलेल्या कामाची दिशा कायम राहील असेही स्पष्ट केले. यावेळी महापलिकेचे सर्व खाते प्रमुख उपस्थित होते.२०१० मध्ये त्यांची भारतीय प्रशासकिय सेवेत निवड झाली. शासनाने गमे यांच्याऐवजी जाधव यांची नियुक्ती केली असली तरी गमे यांच्या नव्या नियुक्तीचे ठिकाण स्पष्ट नाही. नाशिकचे विभागीय आयुक्त राजाराम माने हे सप्टेंबर अखेरीस निवृत्त होत असून त्यांच्या जागीगमे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.जाधव हे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त होते, त्यांनी नाशिकमध्ये यापूर्वी काम केले आहे. १९९८ मध्ये त्यांनी निफाडचे प्रांतााधिकारी म्हणून काम बघितले आहे. तर २००० ते २००४ दरम्यान, नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम बघितले आहे.
जाधव यांनी स्वीकारली सूत्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 1:14 AM
महापालिकेचे नूतन आयुक्त कैलास जाधव यांनी गुरुवारी (दि.२७) आयुक्तपदाचा कार्यभार राधाकृष्ण गमे यांच्याकडून स्वीकारला. शहरविकासाच्या दृष्टीने आवश्यक ते प्रकल्प समन्वयातून पुढे नेण्याचा मनोदय जाधव यांनी व्यक्त केला. दरम्यान, राधाकृष्ण गमे मात्र,नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची नाशिकच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ठळक मुद्देमहापालिका : गमे यांनी दिला कार्यभार; शासन आदेशाची प्रतीक्षा