नाशिकरोड : धन सारखी घातक वस्तू नाही आणि शुद्ध धर्मासारखी उपकारक वस्तू दुसरी नही. संपत्तीचा लोभ जगातील लहान-मोठ्या प्रत्येक व्यक्तीस पिडा देत आहे, असे प्रतिपादन वर्धमान गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वर महाराज म्हणाले की, लक्षात ठेवा संपत्ती-सामग्री आणि स्वजन हे सगळे क्षणिक आनंद देणारे आहेत, पण कायम आनंद द्यायची ताकद मात्र शुद्ध धर्मातच आहे. वरील सर्व एकत्रित करण्यात आपले सर्वांचे महत्त्वाचे पुण्य खर्च होत आहे. त्यामुळे समाधान नावाचे सुख तर आपल्या पासून दूर होत आहे. माझी गोष्ट चुकीची असेल तर मला अडवू शकता, पण तुमचा अनुभव तपासल्यानंतर तुम्हालाच पस्तावा येईल की भगवंताची वाणी ही आपणासाठी कशी उपयुक्त ठरते आणि म्हणूनच मी तुमच्यापुढे ही शालिभद्रची कथा सांगत आहे, असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.कथेचा पुढील भाग सांगताना संगम व त्याच्या आईने रडून रडून खीर तर प्राप्त केली, आता थोड्याच वेळात त्या मनपसंद खिरीचा स्वाद होईल, अशा भावनेत संगम रममाण आहे. तेवढ्यात त्याच्या अंगणात जैन संताचे आगमन झाले. भिक्षेसाठी आलेल्या संताच्या मुखाने ‘धर्मलाभ’चे आशीर्वाद ऐकताच संगम धावत जाऊन संतांना आमंत्रण देत हात पकडून घरात घेऊन आला असे जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज यांनी सांगितले.
संपत्तीचा लोभ पिडा देणारा : सुरीश्वरजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 1:04 AM