खरीप हंगाम पूर्वतयारी बैठकनाशिक : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ात खरिपाचे क्षेत्र सात लाख २० हजार ८०० हेक्टर ठरविण्यात आले असून, त्यासाठी आवश्यक प्रमाणात खतांचा व बियाण्यांचा मुबलक पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची खरीपपूर्व आढावा बैठक जिल्हाधिकारी विलास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. जिल्ात खरीप हंगाम २०१४ साठी सात लाख २० हजार ८०० हेक्टरवर विविध पिकांचे पेरणीखालील क्षेत्राचे लक्ष्य ठरवून दिलेले आहे. खरीप हंगामासाठी जिल्ाला दोन लाख चार हजार ७०० मेट्रिक टन खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले असून, मागील हंगामातील २८ हजार ५६८ मेट्रिक टन खते शिल्लक आहेत. तसेच विविध पिकांचे ९१ हजार ७३४ क्विंटल बियाण्यांची मागणी नोेंदविण्यात आली आहे. सोयाबीन बियाण्यांचा काही प्रमाणात तुटवडा भासण्याची शक्यता असून, त्यादृष्टीने शेतकर्यांंना सोयाबीनच्या घरगुती बियाण्यांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ासाठी बी.टी. कापूस बियाण्यांची दोन लाख २० हजार ६०० पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. त्यापैकी दोन लाख ४८ हजार पाकिटांचे आवंटन मंजूर झाले असल्याचे जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोराडे यांनी सांगितले. या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मधुकर पन्हाळे, महाराष्ट्र कृषी विकास पणन महामंडळाचे व जिल्हा पणन मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
सव्वासात लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट
By admin | Published: May 19, 2014 11:51 PM