शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

त्र्यंबकेश्वर तालुक्यात सरासरी २१ हजार ७७६ हेक्टरवर पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 9:29 PM

त्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.

ठळक मुद्दे शेतकऱ्यांची लगबग : भातासह नागली, खुरसणी, उडीद, भुईमूगास पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कत्र्यंबकेश्वर : यंदा खरीप पिकांमध्ये भाताला जास्त महत्व कृषि विभागाने दिले आहे. यंदा जवळपास 10 हजार हेक्टर मध्ये विविध जातीच्या भाताची लागवड करण्यात येत आहे. त्या खालोखाल नागली खुरसणी उडीद पावसाळी भुईमूग शेंगा कडधान्य वगैरे खरीपाची पेरणी सुरु आहे.त्र्यंबकेश्वरला नेहमी हाता तोंडाशी आलेला घास कधी अतिवृष्टीने, कधी वेळेवर पाउसच न पडल्याने तर कधी वादळी वा-याने भाताच्या तोरंब्या गळून पडतात. असे काही ना काही संकटे येत असतात. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकुण खरीप क्षेत्र 24935 हेक्टर असुन त्यापैकी या वर्षी 21776 हेक्टर क्षेत्रावर यावर्षी ( सन 2020/21) खरीपाची लागवड करण्यात आली आहे. या वर्षी भात 9051 हेक्टर खरीप ज्वारी 68 हेक्टर नागली 3030 हेक्टर वरई 3527 हेक्टर, एकुण तृण धान्य 15676, तुर 1019 हेक्टर उडीद 1648 हेक्टर इतर कडधान्ये 996 एकुण कडधान्ये 3666 हेक्टर भुईमुग 1152 हेक्टर खुरसणी 906 हेक्टर सोयाबीन 66 हेक्टर एकुण तेलिबया 2366 हेक्टर तर ऊस 68 हेक्टर याप्रमाणे खरीप लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र कृषि विभागाने गृहीत धरले आहे. आता प्रत्यक्षात खरीपाची किती हेक्टर क्षेत्रात लागवड होणार आहे. ते 10/15 दिवसात कळेलच. पण या वर्षी भात तथा तांदुळ यांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भाताची लागवड करण्यात आली आहे. काही शेतक-यांची रोपे आवणी (लावणी) लायक झालायाने पुढील आठवड्यात आवणी होईल.विशेष म्हणजे सध्या नाशिक मुंबई सह महाराष्ट्रात कोरोना कोव्हीड -19 चा फैलाव मालेगावला लाजवणारा आहे. जिल्ह्यात भितीचे वातावरण असले तरी पाउस शेतीशेतीची कामे यामध्ये काही वेळ का होईना कोरोनाचा विसर पडत आहे.दिवसें दिवस कृषी क्षेत्रात बदल होत असुन हल्ली यांत्रिक पद्धतीने बळीराजाचा कल दिसुन येत आहे. जवळपास 75 टक्के शेतकरी ट्रॅक्टर कल्टीव्हेटर वगैरेला पसंती मिळत आहे. एवढेच नव्हे तर कृषी विभागच मोठा ट्रॅक्टर घेतल्यास सव्वा लाख रु पयांची सबिसडी तर लहान ट्रॅक्टर साठी एक लाख रु पये सबिसडी देउन यांत्रिक शेती करण्यासाठी अप्रत्यक्ष रित्या एक प्रकारे प्रोत्साहनच देत आहे. संपुर्ण तालुक्या तुन अवघे 25 टक्के लोक पारंपारि क पद्धतीने बैल जोडीच्या माध्यमा तून नांगर वखर या अवजाराच्या सहाय्याने शेती करीत आहेत. सध्या असलेले मृग नक्षत्राचे वाहन म्हैस असल्याने पावसाचे प्रमाण जास्त असते. अशी येथील शेतकरी व जाणकार कृषी तज्ञांची श्रध्दा आहे. पाणघोंगडे ही अंगावर घेण्याची वस्तु बांबुच्या कामट्या पासुन साठा तयार करु न त्यावर काथ्याच्या सहायाने पळसाची पाने गुंफली जात सर्व पाने आच्छादले गेल्यावर पुनश्च सुतळीने विशिष्ट पध्दतीने पळसाची सर्वची सर्व पाने अडकले जाउन एक उबदार व गुबगुबीत पाणघोंगडे तयार होउन अंगावर घेतले की थंडी व पावसापासून संरक्षण मिळत असे पण हल्ली सर्व गोष्टी वेगवान झाल्या मुळे कामट्यांच्या साठ्यावर एक प्लॅस्टीकचे कापड बांधले की झाले पाणघोंगडे तयार होते. हल्ली याच पाण घोंगड्याचा वापर शेतकरी करताना दिसतात.बांधावर बियाणे, खतांची मागणीकृषी विभागाने शेतकऱ्यांना बांधावरच बाजारभावाप्रमाणे खत आणि बियाणांचा पुरवठा केला आहे़ यंदा पाऊस समाधानकारक पडल्याने शेतकरी मंडळी समाधानी आहेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने मजूरांची वाणवा जाणवत आहे़ यामुळे शेतकरी कुटुंब दिवसभर शेतात शारीरिक अंतर राखत काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़ पेरण्यांना अधिक वेग आला आहे़ गेल्या 6/7 दिवसां पासुन त्र्यंबकला दररोज किमान एकदा तरी कमी प्रमाणात पावसाची हजेरी लागत असते. दि.5 जूनपर्यंत केवळ 43 मिमि पावसाची नोंद झाली असली तरी सध्या पेरणी लायक पाउस पडला आहे. नव्हे अधुन मधुन पडत आहे. त्यामुळे पावसाची सुरु वात समाधान कारक आहे. सध्या मात्र पावसाळ्यातील मृग नक्षत्राचे आगमन झाले आहे. दि.5 जुन ते 12 जुन पावेतो कमी अधिक प्रमाणात जवळपास 30 मिमि.पाउस झाला. तर काल दि.13 रोजी 62 मिमि पावसाची नोंद होउन 135 व रविवारी जवळपास 30 मिमि पाऊस होउन आज रविवार दि.165 मिमि. पावसाच्या ओलाव्याने पेणीस आवश्यक पाउस झाला आहे.येत्या दि 22 जुन रोजी पावसाचे दुसरे नक्षत्र आर्द्रा नक्षत्रास सुरु वात होईल. दरम्यान यांत्रिक शेतीला जरी येथे महत्व असले तरी खणणी व आवणीला मनुष्यबळ असल्या शिवाय आवणी होणे शक्य नसते. पर्यायाने शेत मजुरांना दरडोई तीनशे रु पये पावेतो मजुरी मिळते.पुर्वी पाणघोंगड्या च्या सहाय्याने खणणी आवणी केली जाणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी