नाशिक : पावसाचे माहेरघर आणि धरणांचा तालुका म्हणून सर्वांनाच परिचित असलेले इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुके भात पिकाच्या उत्पादनातही अग्रेसर आहे. त्यामुळेच जून महिन्याच्या पूर्वार्धात झालेल्या पावसामुळे तालुक्यातील सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रावर भात लावणीसाठी रोपवाटिका तयार झाल्या असून, काही भागात भात लावणीलाही सुरुवात झालेली आहे. परंतु, जिल्हा कृषी कार्यालयाने जाहीर केलेल्या पीक पेरणी अहवालात प्रत्यक्ष पेरणी क्षेत्र शून्य दाखवले असून यावरून कृषी विभाग अजूनही शेतकऱ्यांच्या बांधापासून कोसो दूर असल्याचे दिसून येत आहे. खरीप हंगाम २०१८-१९ पीकनिहाय पेरणी अहवालात नाशिक जिल्हा कृषी कार्यालयाने भात पिकाच्या ६६ हजार ७४९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी अद्याप कुठेही पेरणी झाली नसल्याचे नमूद केले आहे. प्रत्यक्षात इगतपुरी तालुक्यातील विविध धरणांच्या पाणलोट क्षेत्रासह सिंचन क्षेत्रात भाताच्या रोपवाटिका जून अखेरीस तयार झाल्या असून, सद्यस्थितीत अनेक भागात भात लावणीही सुरू आहे. परंतु, ही माहिती कार्यालयात बसून अहवाल तयार करणाºया अधिकाºयांपर्यंत पोहोचलेली नसल्यामुळे जिल्हा कृषी अधिकाºयांनी जुलै महिना सुरू झाल्यानंतरही जिल्ह्णात अद्याप भाताची लावणी झालीच नसल्याचे अहवालात नमूद केले आहे. विशेष म्हणजे भात लागवडीत अग्रेसर असणाºया इगतपुरी तालुक्यात यंदा ३२ हजार २३७ हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून चालू हंगामात तालुक्यात २७ हजार २०० हेक्टर क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती तालुकास्तरावरून दिली जात असताना जिल्हा कृषी विभागाकडे अद्यापही भात लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र ६६ हजार ७४९ हेक्टर एवढे आहे. यावरून जिल्हा कृषी विभागाने जिल्ह्णातील पीक बदलांचेही अद्याप सर्वेक्षण केले नसल्याचे दिसून येत आहे.भात लावणीची लगबगकृषी विभागाच्या अहवालात पेरणीचे क्षेत्र शून्य दाखविण्यात आले असले तरी प्रत्यक्षात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर तालुक्यात भात लावणीची लगबग सुरू आहे. सद्यस्थितीत कृषिपंपाचा उपसा करून काही शेतकरी भाताची लावणी करीत आहेत. तर अनेक शेतकºयांनी रोपवाटिका तयार केल्या असून, ते लावणीसाठी पावसाची वाट पाहत आहे. सिंचनाची सोय उपलब्ध नसलेल्या ठिकाणी मात्र पेरणीसाठी अजूनही पावसाची प्रतीक्षा असून असे शेतकरीही अपेक्षित पाऊस झाला तर परिसरातून भाताचे रोप विकत घेऊन लावणी करण्याच्या तयारीत आहेत.
कृषी विभागाचा कक्षात बसून पेरणी अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2018 1:37 AM