देशमाने - एक महिन्याच्या कालावधी उलटूनही परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या असून पिण्याचा पाणी प्रश्न देखील अधिकच गंभीर बनला आहे. काही शेतकº्यांनी अल्प ओलीवर खरीप पिकांच्या पेरण्या केल्या परंतु पाऊस न झाल्यास पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.अद्यापही ७५टक्के शेतकº्यांनी अल्प ओलीवर पेरणी करण्यापेक्षा पावसाची प्रतीक्षा करत पेरण्या थांबवल्या आहेत. अगोदरच पेरणीस उशीर झालेला असून पावसाच्या भरवश्यावर पेरण्या लांबणीवर पडून उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त होत आहे.दरम्यान, विहिरी अद्याप कोरड्याठाक असल्याने वाडीवस्त्यावर पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई कायम आहे. दोन टँकरची मागणी करूनही एकाच टँकरने तहान भागवावी लागत असल्याने अनेक वाडीवस्त्यावर नागरिकांना पाण्यासाठी अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.सलग दुसºया वर्षी शेतकऱ्यांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. सुल्तानी संकटाबरोबर आता आस्मानी संकटाने शेतकरी वर्गाचे कंबरडे मोडले आहे.खरीप हंगाम वाया गेला तर अगोदरच आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी वर्ग पुरता कोलमडून जाईल.अनिल गुंजाळ, शेतकरी, देशमाने.
अल्प पावसाने पेरण्या खोळंबल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 4:03 PM
देशमाने - एक महिन्याच्या कालावधी उलटूनही परिसरात समाधानकारक पाऊस नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळंबल्या असून पिण्याचा पाणी प्रश्न देखील अधिकच गंभीर बनला आहे. काही शेतकº्यांनी अल्प ओलीवर खरीप पिकांच्या पेरण्या केल्या परंतु पाऊस न झाल्यास पेरणी वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
ठळक मुद्देपरिसरात पावसाचे मृग नक्षत्र कोरडेच गेले. आद्रा नक्षत्रात झालेल्या जोरदार पावसाने जमीन सडकून बसल्याने पाणी जमिनीत न मुरता वाहून गेले. परिणामी पेरणीयोग्य ओल झाली नाही. काही शेतकº्यांनी अल्प ओलीवर मका, बाजरी, सोयाबीन आदी खरीप पिकांची पेरणी केली.