नाशिक : ७ जूनला हजेरी लावणाऱ्या पावसाने गेल्या काही दिवसांपासून दडी मारल्याने खरिपाच्या पूर्व मशागतीच्या आणि पेरण्यांच्या कामांना अद्यापही वेग आला नसल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाच्या एकूण सरासरी सहा लाख ४२ हजार ८०० हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी अवघ्या तीन हजार ६९८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्याचे वृत्त आहे. मागील वर्षी जूनमध्येच पावसाने दडी मारल्याने सुरुवातीला खरिपाच्या पेरण्या अडचणीत आल्या होत्या. काही भागांत तर दुबार पेरण्यांची वेळ बळीराजावर आली होती. मागील वर्षी अगदी शेवटी शेवटी खरिपाच्या पेरण्यांना वेग आला होता. आताही ७ जूनला कमी-अधिक प्रमाणात जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावणाऱ्या पावसाने नंतरच्या काळात इगतपुरी-पेठ-त्र्यंबक परिसर वगळता अन्य तालुक्यात पावसाने अगदी तुरळक स्वरूपात, तर काही भागांत दडी मारल्याचे चित्र आहे. खरीप हंगामाच्या एकूण सहा लाख ४२ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी सुमारे साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रावरच पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत.
पाऊस लांबल्याने पेरण्या रखडल्या
By admin | Published: June 18, 2015 11:33 PM