चांदोरी (आकाश गायखे) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एक एकरमागे ३ हजार २०० रु पये या प्रमाणे ही मदत आहे. परंतु सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हजार रु पयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्यामुळे नुकसानाच्या या मदतीत शेतीला लागलेल्या बियाण्यांचाही खर्च निघणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतक-यांवर आता अस्मानीनंतर सुलतानी संकट ओढवले आहे.द्राक्षासह सोयाबीन व कांदा उत्पादनात अग्रेसर म्हणून जिल्ह्याला ओळखले जाते. नाशिक जिल्ह्यात सुमारे ७५ हजार ५३६ हेक्टरवर सोयाबीन पेरणी करण्यात आली होती. परंतु जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने सोयाबीन पिकांचे नुकसान झाले. निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील गोदावरी नदी पात्राच्या परिसरातील अनेक शेतकºयांचा सोयाबीन पुरात वाहून गेला.काही सोयाबीनच्या सुद्याना बुरशी आली. तर अनेकांचे शेतात उभे असलेले सोयाबीन सडले.त्यामुळे या पावसाने सोयाबीन पिक वाया गेले. ज्या शेतकºयांकडे द्राक्ष बागा नाहीत त्याचे संपूर्ण अर्थजर्न सोयाबिन पिकावर अवलंबून होते. मात्र सोयाबीनचे नुकसान झाल्याने या शेतकºयांच्या नजरा शासनाकडून मिळणाºया मदतीकडे होत्या परंतु शेतकर्यांसाठी शासनाने शनिवारी मदत जाहीर केल्यानंतर शेतकºयांची मोठी निराशा झाली आहे. जाहीर झालेली ही मदत शेतकर्यांना आता पर्यंत लागलेला खर्च भरून काढणारी सुद्धा नसल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे.-------------------------सोयाबीन खर्च (हजारात)पूर्व मशागत व पेरणी खर्च- ३०००बियाणे व खत खर्च- ३५००आंतर मशागत खर्च- ४०००पीक फवारणी खर्च - २५००शेतमजुरी खर्च - ८०००एकूण खर्च - २१०००------------------------या मदतीतून पिकांना लागलेला खर्च भरूनही निघत नाही. सोयाबीनच्या भरवशावर शेतकºयांचे घर चालत असते. परंतु यंदा सोयाबीनचे पीक हातातून गेले आहे. म्हणून या मदतीमध्ये वाढ करण्याची गरज आहे.-------------- योगेश जाधव, शेतकरी, चांदोरी-------------------------सोयाबीनला आत्तापर्यंत लागलेला खर्च या मदतीतून निघत नाही. जाहीर झालेली मदत तुटपुंजी असून शेतकºयांना न परवडणारी आहे. एक एकराला किमान सरसकट २५ हजार रु पये मदत देऊन आम्हाला दिलासा द्यावा.---------------- गणेश शिंदे, शेतकरी चांदोरी
सोयाबीनला एकरी खर्च २१,०००, मदत केवळ ३ हजार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 3:29 PM
चांदोरी (आकाश गायखे) : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजारांची मदत शनिवारी जाहीर करण्यात आली. एक एकरमागे ३ हजार २०० रु पये या प्रमाणे ही मदत आहे. परंतु सोयाबीनसाठी एका एकराला शेतकऱ्यांना आतापर्यंत २१ हजार रु पयांपेक्षा अधिक खर्च आलेला आहे. त्यामुळे नुकसानाच्या या मदतीत शेतीला लागलेल्या बियाण्यांचाही खर्च निघणे अवघड झाले आहे.
ठळक मुद्देशासनाची तुटपूंजी मदत : पेरणीचाही खर्च निघेना, बळीराची व्यथा कायम