ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील पिंपळे येथे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन उगवणक्षमता प्रात्यिक्षकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी फिजिकल डिंस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.कृषी पर्यवेक्षक डी.एस. कोते यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सोयाबीन बियाणांची उगवणक्षमता चाचणीसाठी शेतकºयांकडे असलेल्या सोयाबीन बियाणांची चाळणी करून त्यामधील काडीकचरा, लहान बियाणे वेगळे करण्यात आले. स्वच्छ झालेले एका आकाराचे बियाणे उगवणक्षमता चाचणीसाठी निवडण्यात आले. चाचणीसाठी सर्वप्रथम बारदान ओले करून घ्यावे, प्रत्येकी दहा बिया घेऊन त्या एका रांगेत समान अंतर सोडून बारदानावर ठेवाव्यात अशा रीतीने १०० बियांच्या दहा ओळी करून गुंडाळी करावी व सावलीच्या ठिकाणी ठेवावी. ती चार दिवस तसीच ठेवावी. त्यावर पाणी शिंपडत राहावे. चार दिवसानंतर उघडून पाहून त्यामध्ये बीजाकृत झालेल्या बिया मोजाव्यात जर ती संख्या ७० असेल तर उगवणक्षमता ७० टक्के आहे, असे समजावे जर ती संख्या ८० असेल तर उगवण क्षमता ८० टक्के आहे, असे समजावे असे कोते यांनी सांगितले. अशा पद्धतीने घरच्या घरी उगवणक्षमतेचा अंदाज घेता येतो. या प्रात्यक्षिकेसाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि खबरदारीच्या नियमांचे व उपाययोजनांचे पालन करून विविध ठिकाणी जाऊन प्रात्यिक्षके करण्यात आली. यावेळी कृषी सहायक नीता खांडेकर, संदीप बिन्नर, गणेश घुगे, किसन बिन्नर, तुकाराम बिन्नर, शिवराम बिन्नर, धोंडीराम बिन्नर, मधुकर बिन्नर, त्र्यंबक बिन्नर, त्र्यंबक बिन्नर, संपत रु पवते, मंगल भागवत आदी शेतकरी उपस्थित होते.
सोयाबीन उगवणक्षमता चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2020 8:54 PM