टरबूज १० रुपये किलो
नाशिक बाजार समितीत टरबूज, खरबूज या फळांची आवक सुरू झाली असून टरबूज ५ ते १० रुपये तर खरबूज १२ पासून २० रुपये किलोपर्यंत विकले जात आहे.
चौकट-
दोडका ५८ रुपये किलो
दोडका, कारली या फळभाज्यांना चांगला दर मिळत असून घाऊक बाजारात दोडका ५८ रुपये किलो पर्यंत विकला जात आहे. तर कारली ५० रुपये किलोपर्यंत आहेत. इतर फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत.
चौकट -
मसाल्याचे पदार्थ महागले
किराणा बाजारात मसाल्याच्या पदार्थांना मागणी वाढल्याने यातील काही पदार्थांचे दर वाढले आहेत. हळदीच्या दरात मोठी वाढ झाली असून ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
कोट -
किराणा बाजारात सध्या ग्राहकी चांगली असल्याने बाजारात तेजी आहे. डाळींचे भाव स्थिर असले तरी खाद्यतेलाच्या दरांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट -
पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर यांच्या किमती वाढल्या असतानाच किराणा मालाच्या दरामध्ये वाढ झाल्याने सर्वसामांन्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. यावर्षी मसाला तयार करावा की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. - रजनी देवरे, गृहिणी
कोट -
भाजीपाल्याचा उत्पादनखर्च आणि त्याला मिळणारा भाव पाहता शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकवावा की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यात खुली करायला हवी -्रअशोक दौंडे, शेतकरी