लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात समाजदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अॅड. आर. के. बच्छाव, सुरेश निकम प्रमुख पाहुणे होते. डॉ. शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी डॉ. शेवाळे म्हणाले की, कर्मवीरांनी बहुजन समाजातील पिढ्यान्पिढ्या अज्ञानाचा अंध:कार नष्ट करून त्यांच्या घरात ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करण्याची दूरदृष्टी ठेवून संस्थेची स्थापना केली असल्याचे सांगत गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. कार्यक्रमास सुरेश निकम, सदस्य अ. र. पवार, प्रा. देवा निकम, संजय महाले, डॉ. टी. पी. देवरे, निकम, सतीश पवार, अशोक देवरे, जयंत बच्छाव, विक्रम पवार, सुरेश बच्छाव, संजय पाटील, सतीश पगार, नीलेश बच्छाव, क्रीडा संचालक प्रा. चंद्रशेखर मोरे, उपप्राचार्य प्रा. डॉ. मनोज जगताप उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले. आभार प्रा. गोरखराज गांगुर्डे यांनी मानले.
सोयगाव महाविद्यालयात समाजदिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 9:58 PM
मालेगाव : सोयगाव येथील मविप्र संचलित कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात समाजदिन साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी फेसबुक लाइव्ह करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य प्रा. डॉ. एच. एम. क्षीरसागर यांनी दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, अॅड. आर. के. बच्छाव, सुरेश निकम प्रमुख पाहुणे होते. डॉ. शेवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
ठळक मुद्देगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले.