नाशिक - महापालिकेच्या महिला व बालकल्याण, विधी, आरोग्य आणि वैद्यकीय सहाय्य तसेच शहर सुधारणा या चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड झाली आहे. गुरुवारी (दि.२६) सभापती-उपसभापतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीची आता केवळ औपचारिकता उरली आहे.महापालिकेत भाजपा सत्तारुढ झाल्यानंतर विधी, आरोग्य आणि वैद्यकीय सहाय्य तसेच शहर सुधारणा या तीन विषय समित्या गठित केल्या होत्या. जुलै २०१७ मध्ये सदर विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. परंतु, यावर्षी प्रभाग समित्यांच्या सभापतीच्या निवडणुकांसोबतच महिला व बालकल्याणसह चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय सत्ताधारी भाजपाने घेतला. त्यानुसार, गुरुवार (दि. २६) रोजी सकाळी १०.३० वाजता विधी, दुपारी १२ वाजता शहर सुधारणा, दुपारी १.३० वाजता आरोग्य व वैद्यकीय तसेच दुपारी ३.३० वाजता महिला व बालकल्याण समितीच्या सभापती-उपसभापतीपदासाठी निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्तांनी घोषित केला. त्यासाठी जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवारी (दि.२४) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. त्यानुसार, चारही समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी सत्ताधारी भाजपाच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्याची औपचारिक घोषणा गुरुवारी (दि.२६) निवडणूक अधिका-यांकडून होईल. चारही विषय समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे. भाजपा-५, शिवसेना-३ तर विधी आणि महिला व बालकल्याण समितीवर कॉँग्रेसचा प्रत्येकी एक तर शहर सुधारणा व आरोग्य समितीवर राष्टवादी कॉँग्रेसचा प्रत्येकी एक सदस्य असे पक्षीय बलाबल आहे. मंगळवारी भाजपाच्या उमेदवारांनी पक्ष पदाधिका-यांच्या उपस्थितीत आपले नामनिर्देशनपत्र नगरसचिव गोरखनाथ आव्हाळे यांच्याकडे सादर केले.या उमेदवारांचे अर्ज दाखलमहिला व बालकल्याण समिती सभापती - कावेरी घुगे, उपसभापती - सीमा ताजणे, वैद्यकीय सहाय्य व आरोग्य समिती सभापती - सतीश कुलकर्णी, उपसभापती - पल्लवी पाटील, विधी समिती सभापती - सुनिता पिंगळे, उपसभापती - सुमन सातभाई, शहर सुधारणा समिती सभापती - पूनम सोनवणे, उपसभापती - अंबादास पगारे.
चारही विषय समित्यांचे सभापती-उपसभापती बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2018 2:53 PM
नाशिक महापालिका : गुरुवारी निवडणुकीची केवळ औपचारिकता
ठळक मुद्दे प्रत्येकी एक अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवड यावर्षी प्रभाग समित्यांच्या सभापतीच्या निवडणुकांसोबतच महिला व बालकल्याणसह चारही विषय समित्यांच्या सभापती-उपसभापतीपदासाठी निवडणुका घेण्याचा निर्णय