नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ३१ जुलै १५ पर्यंत राष्ट्रीय मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम राबविण्यात येत असून, २८ जून रोजी विशेष मोहीम घेण्यात येणार आहे. या दिवशी निरंतर प्रक्रियेतील फॉर्म ६, ७, ८ आणि ८‘अ’देखील आकारले जातील. या कार्यक्रमांतर्गत मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसशी मतदाराचा आधार क्रमांक जोडण्यात येणार आहे. दुबार, मयत तसेच स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत. छायाचित्र मतदार ओळखपत्रातील चुका दुरुस्त करून प्रमाणित मतदार याद्या तयार करण्यात येणार आहेत.आधार क्रमांक मतदार छायाचित्र ओळखपत्राच्या डेटाबेसमध्ये भरण्यासाठी विविध कार्यपद्धतीचा उपयोग करता येणार आहे. भारत निवडणूक आरोग्याचा ँ३३स्र://ीू्र.ल्ल्रू.्रल्ल या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टलवर आधारक्रमांक व इतर माहिती भरता येणार आहे. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्या ँ३३स्र://ूीङ्म.ेंँं१ं२ँ३१ं. ॅङ्म५.्रल्ल संकेतस्थळावरील अपलोड युवर आधार या लिंकवर माहिती भरता येईल. १६६/५१९६९ या क्रमांकावर इसीआयएलआयएनके स्पेस एपिक क्रमांक स्पेस आधार क्रमांक याप्रमाणे एसएमएस करता येईल.मतदारांनी मतदार याद्या शुद्धीकरण व प्रमाणिकरण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी नाशिक यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
मतदार याद्या शुद्धीकरण२८ रोजी विशेष मोहीम
By admin | Published: June 19, 2015 12:16 AM