लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याचे सभासद व कामगारांचे हक्क अबाधित ठेवून कारखाना भाडेतत्त्वावर खासगी व्यापाऱ्यास चालविण्यास देण्यात यावा, असा ठराव मंगळवारी (दि २८) वसाका कार्यस्थळावर झालेल्या विशेष सभेत मांडण्यात आला. त्यास उपस्थित सर्व सभासद व कामगारांनी हात उंचावून सहमती दर्शविल्याने ठराव मंजूर झाला. वसाका भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भांत येथील श्रीराम मंदिरात वसाकाचे ऊस उत्पादक सभासद, कामगार व प्राधिकृत मंडळ यांची संयुक्त विशेष सभा बोलविण्यात आली होती. अध्यक्षस्थानी वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी व आमदार डॉ. राहुल अहेर होते. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देत आहे. त्यात आपल्या सर्वांचा कोणताही अधिकार नसताना राज्य सहकारी बँक व खासगी मालक यांच्यात समन्वय घालून ऊस उत्पादक व कामगारांना त्यांची देणी लवकरात लवकर प्राप्त करून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील, अशी ग्वाही यावेळी आमदार डॉ. अहेर यांनी दिली. वसाका खासगी तत्त्वावर चालविण्यास देत असताना समोरच्या व्यक्तीची क्षमता पाहून सभासदांचे, कामगारांचे हित जोपासले जाईल असा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी यावेळी केली. यावेळी माजी कामगार संचालक विलास सोनवणे, कामगार युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, रामकृष्ण जाधव, उमराणे बाजार समितीचे माजी सभापती विलासकाका देवरे, राजेंद्र पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, वसाका बचाव कृती समितीचे अध्यक्ष प्रभाकर पाटील, कारभारी बिरारी, राजेंद्र देवरे, कुबेर जाधव, शशिकांत निकम, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, डॉ. पोपटराव पगार आदींनी मनोगत व्यक्त करून वसाका खाजगी तत्त्वावर चालविण्यास देत असताना ऊस उत्पादकांना व कामगारांना योग्य न्याय मिळावा, अशी मागणी केली. या विशेष सर्वसाधारण सभेसाठी संतोष मोरे, जिल्हा बँकेचे संचालक धनंजय पवार, मविप्रचे संचालक अशोक पवार, देवळा बाजार समितीचे सभापती बापू देवरे, माजी संचालक नारायण पाटील, वसंतराव निकम, अण्णा शेवाळे, बाळू बिरारी, कृष्णा बच्छाव,अशोक वाघ, ग्यानदेव बच्छाव, यशवंत पाटील, बाबूराव पाटील, महेंद्र हिरे, माजी सभापती आत्माराम भामरे, दगडू भामरे, विलास निकम, देवळा नगरपंचातीचे उपनगराध्यक्ष अतुल पवार, युवानेते संभाजी आहेर, शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, जगदीश पवार, सुधाकर पगार, शांताराम जाधव, सुनील पगार, प्रभाकर पाटील, राजेंद्र पवार,दिनकर देवरे, कळवण बाजार समितीचे संचालक मोहन जाधव, नंदकुमार खैरनार,देवळा नगरपंचायतीचे गटनेते जितेंद्र आहेर, ओंकार शेवाळे, शांताराम शेवाळे,माणीक निकम, शंकर निकम, प्रशांत शेवाळे, कामगार युनियनचे सचिव रविंद्र सावकार, वार्षीचे माजी सरपंच भिला सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते. कुबेर जाधव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कसमादे परिसरातील ऊस उत्पादक, सभासद, वाहतूकदार, कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वसाकाच्या खासगीकरणाचा विशेष सभेत ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 1:48 AM