नाशिक : हरविलेल्या मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी राज्य पोलीस दलातर्फे संपूर्ण जुलै महिन्यात एक विशेष अभियान अर्थात ‘आॅपरेशन मुस्कान’राबविण्यात येते आहे़ या संदर्भात पोलीस अधिकाऱ्यांना माहिती मिळावी यासाठी ग्रामीण पोलीस मुख्यालयात दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले़ यामध्ये पुणे येथील अधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले़ राज्यातून मुला-मुलींना पळविण्याच्या प्रकरणांचा आढावा घेतला असता भीक मागण्यासाठी, अन्य राज्यांत विक्री करण्यासाठी, देह विक्रीसाठी वा मोलमजुरीची कामे करून घेण्यासाठी मुलांचे अपहरण केले जात असल्याचे समोर आले आहे़ त्यामुळे संपूर्ण जुलै महिनाभर राबविण्यात येणाऱ्या ‘आॅपरेशन मुस्कान’मध्ये हरविलेल्या मुला-मुलींचा अनाथ आश्रम, रेड लाईड एरिया, हॉटेल आदि ठिकाणांवर विशेष पोलीस पथकांच्या नेमणूक करून शोध घेतला जाणार आहे़ तसेच ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते व अपर पोलीस अधीक्षक प्रशांत मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रशिक्षण कार्यशाळेत पोलीस निरीक्षक किशोर नवले, सहायक पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी, कोकाटे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी सहभागी झाले होते़
राज्य पोलीस दलातर्फे विशेष अभियान
By admin | Published: June 30, 2015 1:13 AM