नाशिक : कोरोना काळात शहर पोलिसांच्या मदतीसाठी विशेष पोलिस अधिकारी म्हणून कार्य करणाऱ्या नासिक सराफ असोसिएशन व नासिक क्लॅाथ मर्चंट असोसिएशनच्या कार्याची दखल घेऊन शुक्रवारी (दि.२१) पोलिस व जिल्हा प्रशासनातर्फे अशाप्रकारे विशेष पोलीस अधिकारी म्हणून काम करणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींचा सन्मान करून संघटनांप्रति आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी शहर पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड व्यासपीठावर उपस्थित होते. शहरात एप्रिलमध्ये लागू करण्यात आलेल्या लॅाकडाऊनच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारवाडा पोलिसांकडून सराफ व कपडा असोसिएशनच्या ४५ पदाधिकाऱ्यांना विशेष पोलिस अधिकारी असा दर्जा देण्यात आला असून हे अधिकारी सध्या सरकारवाडा पोलिस स्टेशन हद्दीतील विविध चेकनाक्यांवर गर्दीवर नियंत्रण व विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची मदत करीत आहेत. त्यांच्या सहकार्याची दखल घेत शुक्रवारी धुमाळ पॅांईन्ट येथे कौतुकाची थाप देण्यात आली. यावेळी नासिक सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे, सेक्रेटरी किशोर वडनेरे, उपाध्यक्ष मेहुल थोरात, माजी अध्यक्ष चेतन राजापूरकर, योगेश दंडगव्हाळ, सुनील महालकर, कृष्णा नागरे, शाम तांबोळी, पवन महालकर, सुनिता दौंडकर, सुभाष सोनवणे, नासिक क्लॅाथ मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नीलेश जाजू, हेमंत कुलकर्णी, तुषार मनियार, पवन पारख, मकरंद सुखात्मे, आशिष ठोंबरे, गोटू चोरडिया, गौतम हिरन, प्रसाद चौधरी, मधुसूधन मुंदडा, मकरंद सोनी आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते.
कोट-
गेल्या वर्षीपासून सराफ असोसिएशनचे पदाधिकारी पोलिस प्रशासनाला मदत व्हावी या हेतूने काम करीत आहेत. यापुढेही गरज असेल त्यावेळेस असोसिएशनची टीम पोलिसांच्या मदतीसाठी कायम तयार असेल .
- गिरीश नवसे, अध्यक्ष, नासिक सराफ असोसिएशन.
===Photopath===
220521\22nsk_20_22052021_13.jpg
===Caption===
विशेष पोलीस अधिकारी म्हणून सेवा देणाऱ्या व्यापारी संघनांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंही जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, मनपा आयुक्त कैलास जाधव , मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड