लोकमत न्यूज नेटवर्कघोटी : जीवाची पर्वा न करता कर्तव्यासोबत मानवधर्माचे काम करून १३ जणांचा प्राण वाचवणाºया पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅल्युट केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले.मुंबई येथे राज्याचा पोलीस परिवहन विभाग, मुंबई वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात चोख कर्तव्य बजावून नागरिकांचा जीव वाचवणाºया ७ पोलीसांना मुख्यमंत्र्यांनी सॅल्युट केला.२ महिन्यांपूर्वी मुंबई आग्रा महामार्गावर एका टेम्पो ट्रॅव्हल वाहनाने अल्प प्रमाणात पेट घेतला. ह्या वाहनातून अचानक धुर येवू लागल्याची घटना घोटी केंद्रातील महामार्ग पोलिसांच्या ध्यानात आली.महामार्ग पोलीस पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय हिरे, पोलीस हवालदार संजय क्षीरसागर, पोलीस नाईक योगेश पाटील, जितेंद्र पाटोळे, पोलीस शिपाई केतन कापसे, विक्र म लगड ह्या ७ जणांनी तातडीने समयसूचकता दाखवली.त्यांनी तातडीने जळणाºया वाहनात बसलेल्या १३ नागरिकांना मागील दरवाजाने सुरक्षित बाहेर काढले. सर्वांना सुरक्षित स्थळी नेऊन आपले कर्तव्य पार पाडले. जळणाºया वाहनात ३ बालके आणि इतर महिला व पुरु ष होते. या प्रवाशांना बाहेर काढतांना त्या वाहनाने पेट घेतला. मात्र ७ पोलीस अधिकारी आणि कर्मचाºयांच्या समयसूचकता, आणि कर्तव्यधर्मामुळे संभाव्य जीवित हानी टळली.ह्या पार्श्वभूमीवर घोटी केंद्रातील महामार्ग पोलीस पथकातील ७ पोलिसांच्या विशेष कार्याची दखल वरिष्ठ स्तरावर घेण्यात आली. त्यानुसार मुंबई येथे संपन्न झालेल्या ३१ व्या राज्य रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्र मात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या सात पोलीस कर्मचाºयांचा विशेष पुरस्काराने गौरव करण्यात आला.यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या नागरिकांच्या रक्षणासाठी किटबद्ध होऊन जीवाची बाजी लावणाºया ७ पोलीस कर्मचाºयांना सॅल्युट करतो असे गौरवास्पद उद्गार काढले.यावेळी व्यासपीठावर परिवहन व संसदीय कामकाज मंत्री अनिल परब, राज्यमंत्री सतेज पाटील, खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर, प्रधान सचिव आशीषकुमार सिंह, अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) विनय कोरेगावकर, पोलीस सहआयुक्त मधुकर पांडे, परिवहन आयुक्त शेखर चन्ने आदी उपस्थित होते.
१३ जणांचा प्राण वाचवणाऱ्या ७ पोलिसांना विशेष पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 5:08 PM
घोटी : जीवाची पर्वा न करता कर्तव्यासोबत मानवधर्माचे काम करून १३ जणांचा प्राण वाचवणाºया पोलिसांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅल्युट केला. मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्याच्या घोटी केंद्रातील ७ पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे कौतुक करून त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले.
ठळक मुद्देघोटी : नागरिकांच्या रक्षणासाठी कटिबद्ध झाल्याची दखल