पंचवटी : नांदूर नाक्यावरील शेवंता लॉन्स येथे रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व पादुका दर्शन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पादुका दर्शनाच्या अभूतपूर्व सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. नाशिक जिल्हा श्री सत्संग सेवा मंडळाने सोहळ्याचे आयोजन केले होते.सकाळी नांदूर येथील मारुती मंदिरापासून पादुकांची सवाद्य शोभायात्रा काढण्यात आली. नगरसेवक उद्धव निमसे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शोभायात्रेची सुरुवात झाली. यावेळी उत्तर महाराष्ट्र उपपीठ व्यवस्थापक राजेंद्र गरुड, जिल्हा निरीक्षक संदीप थोरात, जिल्हा अध्यक्ष संदीप खंडारे, सचिव वैभव शिरसाठ, जिल्हा महिला अध्यक्ष मंगला झनकर उपस्थित होते. शोभायात्रेत प्रथमस्थानी ध्वजधारी पुरुष तसेच कलशधारी महिला, तुळसधारी महिला सहभागी झाल्या होत्या. शोभायात्रेत घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, स्वामी गजानन महाराज यांचा जिवंत देखावा साकारण्यात आला होता. शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बैलगाडीदेखील चित्ररथात सहभागी करण्यात होती शोभायात्रेतील ढोलपथक मिरवणुकीचे आकर्षण होते. यावेळी भाविकांनी नरेंद्राचार्य यांच्या सिद्ध पादुकांचे पूजन शास्त्रोक्त मंत्रोच्चाराने करण्यात आले. त्यानंतर नरेंद्राचार्य लिखित ‘लीलामृत’ ग्रंथाच्या नवव्या अध्यायाचे सामुदायिक पारायण करण्यात आले. यावेळी नवीन साधकांना श्रींच्या असते साधक दीक्षा देण्यात येऊन महाआरतीने सोहळ्याची सांगता करण्यात आली.भाविकांसाठी आॅनलाइन प्रवचनजगदगुरू श्री नरेंद्राचार्य महाराज यांच्या अमृतवाणीचा शेकडो भक्तांनी आॅनलाइन लाभ घेतला. सदगुरुंची सेवा केली, तर इष्ट फळ प्राप्त होते, देवाअगोदर गुरुंना भजावे. गुरू अंधकारातून मनुष्याला बाहेर काढतो. आत्ममुक्तीची जाणीव सद््गुरुमुळे होते म्हणून सद््गुरुंची सेवा करताना गुरुविषयी मनात शंका नसावी, असेही त्यांनी शेवटी सांगितले.
नरेंद्र महाराज पादुकांची सवाद्य मिरवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:37 AM
नांदूर नाक्यावरील शेवंता लॉन्स येथे रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व पादुका दर्शन सोहळा शनिवारी उत्साहात पार पडला. शेकडो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या पादुका दर्शनाच्या अभूतपूर्व सोहळ्याने भाविकांच्या डोळ्याचे पारणे फिटले. नाशिक जिल्हा श्री सत्संग सेवा मंडळाने सोहळ्याचे आयोजन केले होते.
ठळक मुद्देप्रवचन सोहळा : दर्शनासाठी भाविकांची गर्दी