निफाड : तालुक्यातील बिट,केंद्र, शाळा परिसरातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी दिली.१० मार्च २०२१ पर्यंत सदर शोध मोहीम राबवण्यात येणार आहे. शाळेत कधीच दाखल न झालेली मुले, शाळेत न जाणारी मुले, प्राथमिक शाळेत एक महिन्यापेक्षा जास्त काळ गैरहजर असलेली मुले, स्थलांतर करणाऱ्या कुटुंबातील मुले या सर्व मुलांचा शोध घेऊन १०० टक्के बालकांना शाळेच्या प्रवाहात दाखल करून त्यांच्या शिक्षणाच्या हक्काची पूर्तता करणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कोविड १९ संसर्ग कालावधीत अनेक कुटुंबाचे स्थलांतर झाले असून ६ ते १४ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे निदर्शनास आले आहे.
शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2021 8:41 PM
निफाड : तालुक्यातील बिट,केंद्र, शाळा परिसरातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष शोध मोहीम सुरू करण्यात आली असल्याची माहिती निफाडचे गटशिक्षणाधिकारी केशव तुंगार यांनी दिली.
ठळक मुद्दे६ ते १४ वयोगटातील अनेक बालके शाळाबाह्य झाल्याचे निदर्शनास आले आहे.