सिन्नर : नगर परिषदेने शहरात अनधिकृत नळजोडणी व मुख्य जलवाहितीवरील नळजोडणी या विरोधात कारवाई करण्यात आली असून, अनधिकृत नळजोडणीधारकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले आहे.सिन्नर नगरपरिषदेतर्फे अनधिकृत नळजोडणीधारक शोधण्याकरिता विशेष पथकाची स्थापना करण्यात आली असून, त्याद्वारे शोधमोहीम केली जाणार आहे. यात ज्यांनी बेकायदा नळजोडण्या घेतल्या आहेत. त्यांच्यावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहरात काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत नळजोडण्यात व मुख्य जलवाहिनीवरून नळजोडण्या घेण्यात आल्याचे आढळून आले आहे. बेकायदा पाणीचोरीमुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या नियोजनावर विपरीत परिणाम होत आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेवून सामाजिक कार्यकर्ते संजय चव्हाणके यांनी आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला होता. याची नगर परिषदेने तत्काळ दखल गेत पाणीपुरवठा अभियंता व इतर कर्मचाऱ्यांच्या शोधमोहिमेचे पथक स्थापन केले. या पथकाने आतार्यंत ५८१ नळजोडण्या अधिकृत केल्या आहेत. यापुढेही कारवाई सुरू राहणार असून, भविष्यात अशा प्रकारची अनधिकृत नळजोडणी आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होऊन त्यांची नळजोडणी कायमस्वरूपी नाकारण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली नळजोडणी अधिकृत असल्याची खात्री करून घ्यावीच, तसेच नसल्यास पालिकेत रीतसर अर्ज व शुल्क भरून अधिकृत करून घेण्यात आवाहन नगर परिषदेतर्फे करण्यात आले आहे.परिसरातील अशी अनधिकृत नळजोडणी आढळल्यास पालिकेच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून अनधिकृत नळजोडणी विषयी माहिती देवून पालिकेस सहकार्य करावे, माहिती देणाºयाचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल असे आवाहन मुख्याधिकारी दुर्वास यांनी केले आहे.
सिन्नरला अनधिकृत नळजोडणीधारक शोधण्यासाठी विशेष पथक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 6:42 PM
नगर परिषदेने शहरात अनधिकृत नळजोडणी व मुख्य जलवाहितीवरील नळजोडणी या विरोधात कारवाई करण्यात आली असून, अनधिकृत नळजोडणीधारकांविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास यांनी सांगितले आहे.
ठळक मुद्देकायदेशीर कारवाई करणार