मनमाड : राष्टÑीय रक्षा अकादमी (एनडीए) व नौसेना अकादमीच्या (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या गाड्यामध्ये प्रवास करणाºया प्रवाशांना प्रवास करताना कोविड-१९ साठी देण्यात आलेले सर्व नियम व अटींचे पालन करणे बंधककारक असणार आहे. मेमू गाड्या सोडून सर्व गाड्या पूर्णपणे आरक्षित असतील तरी प्रवाशांनी आरक्षित टिकट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे सूत्रांनी केले आहे. विशेष गाडीचे आरक्षण ४ सप्टेबर रोजी सायंकाळी ६ वाजेनंतर सुरू करण्यात येणार आहे. एनडीए व एनएची परीक्षा देणाºया विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉलतिकीट सोबत ठेवणे बंधनकारक आहे.दि. ५ व ६ सप्टेंबर रोजी सोडण्यात येणाºया गाड्यांपैकी आठ गाड्यांना मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला असल्याने एनडीएची परीक्षा देणाºया परिसरातील विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली आहे. यामध्ये जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी नाशिक - नागपूर व नाशिक - मुंबई या दोन स्वतंत्र गाड्या सोडण्यात येणार आहेत.
एनडीएच्या परीक्षार्थींसाठी धावणार विशेष रेल्वेगाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2020 11:14 PM
राष्टÑीय रक्षा अकादमी (एनडीए) व नौसेना अकादमीच्या (एनए) परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना आपल्या परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी मध्य रेल्वेने १२ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्दे निर्णय : मनमाड रेल्वेस्थानकावर आठ गाड्यांना थांबा