नाशिक : महापालिकेच्या पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनात हस्तक्षेप केला जात असून, हजेरी शेडवर जाऊन कागदपत्रे तपासणे तसेच उद्यान विभागात केलेल्या कामांचा हिशेब विचारणे यामुुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी तसेच कर्मचाऱ्यांनी महापौर रंजना भानसी यांना साकडे घातले आणि दखल घेण्याची मागणी केली. दरम्यान, धनगर यांनी मात्र प्रशासनावरच आरोप केले आहेत.महापालिकेच्या पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्याकडून प्रशासनातील अधिकाºयांना त्रास दिल्याच्या तक्रारी यापूर्वीदेखील महापौर रंजना भानसी यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. मात्र गुरुवारी (दि.१३) धनगर यांचे पती आणि बंधू यांनी गोरक्षनगर येथील हजेरी शेडवर जाऊन कागदपत्रे तपासली तसेच याठिकाणी नाशिकरोड येथील सफाई कामगारांची नियुक्ती असल्याने त्यांना येण्यास काही विलंब झाल्यास त्यांची गैरहजेरी लावण्यास सांगितले जाते. याप्रकारामुळे गुरुवारी स्वच्छता निरीक्षक आणि सफाई कामगार यांचे त्यांच्याशी वाद झाले यावेळी सफाई कामगारांना उद्देशून अपशब्द वापरल्याचा आरोप आहे. या प्रकारानंतर सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पंचवटी परिसरातील सुमारे दीडशे सफाई कामगारांनी महापौर रंजना भानसी यांच्या निवासस्थानी जाऊन ठाण मांडले. मुळाच सफाई कामगारांची कागदपत्रे तपासण्याचे कायदेशीर अधिकार धनगर यांच्या पती आणि भावाला नाही असे असताना ते शेडवर येऊन कागदपत्रे तपासतात तसेच वाद घालून अपशब्द वापरत असल्याचे या कामगारांनी सांगितले. यासंदर्भात या कामगारांनी लेखी निवेदनच महापौरांना दिलेहोते.दरम्यान, दुपारी महापौरांच्या रामायण या निवासस्थानी उद्यान निरीक्षक वसंत ढुमणे यांनी येऊन तक्रार केली. पंचवटीत उद्यान निरीक्षक कार्यालयात येऊन धनगर कुटुंबीय मानसिक त्रास देत असून त्याची दखल घ्यावी अन्यथा स्वेच्छानिवृत्ती घेत असल्याचे त्यांनी सांगितले. उद्यान विभागाच्या वरिष्ठांनादेखील महापौरांनी बोलावून घेतले. त्यांनीदेखील यास दुजोरा दिला.
पंचवटीत सभापती धनगर यांच्या कुटुंबीयांकडून जाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 1:54 AM
महापालिकेच्या पंचवटी प्रभागाच्या सभापती पूनम धनगर यांच्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रशासनात हस्तक्षेप केला जात असून, हजेरी शेडवर जाऊन कागदपत्रे तपासणे तसेच उद्यान विभागात केलेल्या कामांचा हिशेब विचारणे यामुुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी तसेच कर्मचाऱ्यांनी महापौर रंजना भानसी यांना साकडे घातले आणि दखल घेण्याची मागणी केली. दरम्यान, धनगर यांनी मात्र प्रशासनावरच आरोप केले आहेत.
ठळक मुद्देसफाई कामगार त्रस्त : महापौरांकडे मागितली दाद, उद्यान विभागाचीही तक्रार