इगतपुरी : नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी दिली आहे.महामार्गावर होणारे अपघाताचे प्रमाण शून्य टक्के व्हावे याकरिता सुरक्षेचा उपाय म्हणून नाशिक-मुंबई एक्स्प्रेस वे कंपनीमार्फत अत्याधुनिक तंत्रप्रणालीद्वारे महामार्गावर चालणाºया वाहनांची गती मोजली जाणार आहे. वाहनांचा वेग मोजणारा हा भारतातील पहिलाच प्रयोग आहे. या कॅमेºयाद्वारे सुमारे ५०० मीटर दूरच्या गाडीचा वेग समजून येणार आहे. वाहन अतिवेगात असेल तर तशी सूचना कन्ट्रोल रूमला प्राप्त होईल. वाहनचालकांच्या हालचालीही समजणार असून, त्यात फोनवर बोलणे, दारू पिणे, गप्पा-मस्करी करणे आदी छायाचित्रेसुद्धा हा कॅमेरा टिपू शकणार आहे. यामुळे वाहनचालकांच्या वेगावर मर्यादा येऊन अपघात कमी होतील. दरम्यान, या कॅमेराद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाईदेखील होणार आहे. कोणतेही वाहन कॅमेराच्या कक्षेत असेल व ते नियमबाह्य हालचाली करीत असेल तर त्या गाडी मालकाचा तीन महिन्यांसाठी वाहन परवाना रद्द होऊन त्याच्या भ्रमणध्वनीवर तसा मेसेज कन्ट्रोल रूममार्फत तत्काळ जाण्याची सुविधा या डिजिटल कॅमेरात आहे. दररोज होणारे लहान-मोठे अपघात व त्या संबंधित सूचना, घटनास्थळांचे चित्रीकरण, काही वेळातच जिल्हा कन्ट्रोल रूमपर्यंत पोहोचण्यासाठी एक पथक कॅमेरा व्हॅनमार्फत सतर्क राहणार असल्याचे सुरक्षा अधिकारी दिलीप पाटील यांनी सांगितले.यावेळी अरविंद सिंग, विजय राठोड, राजेश चौबे, संजय पाटील, नगराध्यक्ष संजय इंदुलकर, वाहतूक शाखेचे पोलीस उपअधीक्षक सुभाष पवार, राजेंद्र गुप्ता यांनी उपस्थितांना वाहन सुरक्षेविषयी मार्गदर्शन केले.
मुंबई-आग्रा महामार्गावर स्पीड कॅमेऱ्याची नजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 1:35 AM
नाशिक-मुंबई महामार्गावर इगतपुरीजवळ स्पीड कॅमेºयाद्वारे वाहनांची गती मोजण्याबरोबरच वाहनचालकांच्या हालचालींवर नजर ठेवली जाणार असून, त्याद्वारे अपघातांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलीस आयुक्त विजय पाटील यांनी दिली आहे.
ठळक मुद्देसुरक्षेचा उपाय : वाहनचालकांच्या हालचाली टिपणार