सिडको : अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (आयमा) या औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व इतर पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ येत्या मे महिन्यात संपुष्टात येत असून, नव्या पदाधिकायांची निवडणूक प्रक्रिया राबविण्याच्या हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी एकता पॅनलने अध्यक्ष पदाचे उमेदवार घोषित केले असल्याने आता विरोधी पॅनलकडूनही व्यूहरचना आखण्यास सुरुवात केल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. आयमा या संघटनेत सुमारे पंधराशे उद्योजक सहभागी झाले असून, दर दोन वर्षांनी करण्यात येते. मागील अनेक वर्षे ही निवडणूक सर्वसंमतीने आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने बिनविरोध करण्याची परंपरा असली तरी यंदा मात्र ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी वाटत आहे. सध्याचे विद्यमान अध्यक्ष असलेले राजेंद्र अहिरे यांच्या वेळी निवडणूक प्रक्रिया होण्याची वेळ आली होती, परंतु यातही आयमामधील वरिष्ठांनी केलेल्या तडजोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध पार पडली. आता पुन्हा मे २०१८ मध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीत सत्ताधारी एकता पॅनलने सध्याचे उपाध्यक्ष असलेले वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचे उमेदवार नुकतेच घोषित केले आहे. आयमाच्या दुसºया गटाचे उमेदवार असलेले तुषार चव्हाण यांना वरिष्ठांनी दोन वर्षांपूर्वी राजेंद्र अहिरे अध्यक्ष केल्यानंतर पुढील म्हणजे २०१८च्या निवडणुकीत अध्यक्ष करण्याचा शब्द आयमाच्या माजी पदाधिकाºयांनी दिला होता. परंतु असे असतानाही सत्ताधारी पॅनलने आधीच वरुण तलवार यांना अध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केल्याने दुसºया गटाच्या पॅनलमध्ये नाराजीचा सूर पसरला असल्याचे दिसून येत आहे. दुसºया गटाच्या पॅनलचे अध्यक्ष पदाचे उमेदवार तुषार चव्हाण हे येत्या सोमवारी बैठक घेणार आहे.
आयमा निवडणुकीच्या हालचालींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:12 AM