नाशिक : मुथूट फायनान्सच्या कार्यालयात दरोड्याच्या इराद्याने हल्लेखोरांनी घुसून केलेल्या बेछुट गोळीबार प्रकरणाच्या तपासाला पोलिसांकडून चौहोबाजूंनी गती दिली गेली आहे. सकारात्मक सुगावे पथकांच्या हाती आल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असला तरी अद्याप ठोस पुरावे हाती आल्याची कुठलीही माहिती पोलिसांकडून दिली गेली नाही. हल्लेखोरांच्या मागावर दहा पथके वेगवेगळ्या पद्धतीने असल्याचे सांगण्यात आले.शुक्रवारी (दि.१४) शहरातील उंटवाडी या गजबजलेल्या परिसरात सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारासहल्लेखोरांनी फायनान्स कार्यालयात दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यांचा हा प्रयत्न सॅम्युअल नावाच्या धाडसी कर्मचाऱ्याने प्रसंगावधान दाखवून हाणून पाडला; मात्र दुर्दैवाने त्याला या हल्ल्यात बळी पडावे लागले. दरोडेखोरांनी एक-दोन नव्हे तर तब्बल पाच गोळ्या त्याच्या शरीरावर झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. भरदिवसा झालेल्या या धाडसी दरोड्याने अवघे शहर हादरून गेले. हल्लेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती उशिरा का होईना लागले आहेत. फुटेजमध्ये संशयित हल्लेखोरांचे छायाचित्र बºयापैकी स्पष्ट असून त्याआधारे पोलिसांकडून तपास केला जात आहे. दस्तुरखुद्द पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घातले असून, दहा पथकांना वेगवेगळ्या पद्धतीने हल्लेखोरांचा माग काढण्याचे आदेश त्यांनी दिले आहे. या दहा पथकांमध्ये विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यासोबत गुन्हे शोध पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक, गुन्हे शाखा युनिट-१ व २च्या अधिकारी-कर्मचाºयांचे पथक सहभागी आहेत. शहराअंतर्गत तसेच राज्यातील विविध.दरोडेखोरांनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी सोडून पळ काढला आहे. सापडलेल्या तीन दुचाकी चोरीच्या असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले आहे. त्यांचे क्रमांक बनावट असल्याचेही सिद्ध झाले आहे.
गोळीबाराच्या तपासाला चौहोबाजूंनी गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2019 12:37 AM