त्र्यंबकेश्वर : पावसाळा येऊन ठेपला असताना तालुक्यात आपली घरे, गोठे, पडवी व चार महिन्याचे इंधन लाकुडफाटा साठवण्यासाठी आदिवासी बांधवांची लगबग सुरू झाली आहे. वाड्या पाड्यावर राहणा-यां पासुन ते अगदी शहरातील बंगल्याची देखील डागडुजी होत आहे. मात्र खेड्या पाड्यातील गरीबांच्या घरांची डागडुजी वेगळी असते. काही लोकांच्या घरावर कुहीटाचे छप्पर असते. कुहीट तयार करतांना गंधन नावाचे नदीच्या किनारी जाड गवत असते. छपराच साठा तयार झाला की त्यावर कुड अंथरतात.त्यावर गंधन गवत दाट स्वरु पात पसरु न त्यावर पळसाची पाने अंथरु न ती कामट्यांनी बांधतात. परत आपल्याकडील तनस किंवा गवताचा थर पसरु न वरती प्लॅस्टिकचे लांब रु ंद कापड बांधतात. मग कुणी कुडाच्या भिंती तर कुणी दगड विटाच्या भिंती तर कुणी जुने विकत घेतलेल्या पत्र्याच्या भिंती तयार करतना दिसत आहेत.
त्र्यंबकेश्वर तालुक्यात घरे दुरुस्तीस वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 04, 2020 9:11 PM