नाशिक : कोरोनामुळे सर्वत्र लसीकरण मोहिमा ठप्प झाल्याने बालकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. देशभरासह नाशकातदेखील हीच स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक दायित्व लक्षात घेता शहरातील नामको चॅरिटेबल ट्रस्टने नामको हॉस्पिटलमध्ये लसीकरण केंद्र शुक्रवारी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफच्या अहवालानुसार कोरोनामुळे बहुतांश देशांमधील लसीकरण मोहिमा थांबल्या आहेत. तसेच गोवरचे लसीकरण पूर्णपणे ठप्प झाले आहे. पल्स पोलिओ लसीकरणावरही याचा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. भारतातील लसीकरणाच्या मोहिमादेखील कोरोनामुळे प्रभावित झाल्या आहेत. परिणामी लॉकडाऊनच्या अलीकडे आणि पलीकडे जन्मलेल्या मुलांच्या पालकांना मोठी चिंता भेडसावते आहे. त्याशिवाय या काळात प्रतिकारशक्ती कमी झालेल्या व्यक्ती वरुग्णांनादेखील लसीकरणाची गरज भासते आहे. मात्र, सरकारी वैद्यकीय यंत्रणा कोरोनाविरोधातील लढ्यात शर्थीचे योगदान देत असल्याने आवश्यकता असतानाही लसीकरण थांबले आहे. ही गंभीर बाब लक्षात घेता विविध आजारांवर उपचारासाठी सुसज्ज यंत्रणा व तज्ज्ञ डॉक्टर्सची सेवा उपलब्ध करून देणाऱ्या नामको हॉस्पिटलने लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. स्रीरोगतज्ज्ञ तथा प्रिव्हेंटिव्ह मेडिसीन तज्ज्ञ डॉ. श्रद्धा वाळवेकर आणि बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुपमा डहाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे केंद्र सुरू केले जात आहे. मोठ्यांसाठी फ्लू, स्वाईन फ्लू, मेंदुज्वर, जापनीज मेंदुज्वर, कॉलरा, रॅबिज, यलो फीवर, न्युमोनिया यासाठीदेखील लस उपलब्ध करून दिली जाणार आहे.-----------------या व्यक्तींना होणार लाभजन्मजात आजार, जुने हृदयाचे आजार, दम्यासारखे श्वसनविकार, रक्ताशी संबंधित आजार, किडनीविकार, लिव्हरसंबंधित व्याधी, मधुमेह, स्टेरॉईड्स, किरणोपचार घेणारे रु ग्ण, कॅन्सर, मज्जारज्जूतील पाणी कमी होणे, कानाच्या पडद्याचे प्रत्यारोपण,प्लीहाविकार, साथीचे आजार, आरोग्य कर्मचारी, डायग्नोस्टिक विभागातील कर्मचारी, सतत प्रवास करणारे व्यक्ती, पाळीव प्राणी असणाºया घरातील व्यक्ती, संसर्गजन्य आजार दूर ठेवण्यासाठीच्या लस येथे उपलब्ध राहणार आहेत.
लसीकरण केंद्राच्या कामास मिळणार गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:27 PM