शहरं
Join us  
Trending Stories
1
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
2
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
3
जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार...
4
चोरी केल्यानंतर ते शिर्डी गाठायचे, साईबाबांच्या चरणी 'दान' ठेवायचे! काळाचौकी पोलिसांची २४ तासांत कारवाई; दोन तरुण चोर जेरबंद
5
वर्सोवा-भाईंदर कोस्टल प्रकल्पासाठी ४५ हजार खारफुटी तोडणार; हायकोर्टाचा हिरवा झेंडा
6
अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार
7
पतीकडूनच सर्पदंश करवून पत्नीची हत्या, ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाल्याचा बनाव; तिघांना अटक
8
मुंबईच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी 'हाउसिंग फॉर ऑल' योजना
9
मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, मुख्यमंत्र्यांचा दावा! जागावाटपावर फडणवीस यांचे स्पष्टीकरण
10
पीएचडी शिष्यवृत्तीला आता शिस्तीची चौकट; अर्थ खात्याकडून पैसे न मिळाल्याने शिष्यवृत्तीची रक्कम रखडली!
11
सर्व्हेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यांवर जमावाकडून दगड आणि धनुष्यबाणांद्वारे हल्ला, ४७ जण जखमी   
12
आजचे राशीभविष्य - १४ डिसेंबर २०२५, कार्य साफल्याचा दिवस, नवे काम सुरू कराल
13
राज्यातील सर्व २९ महापालिकांची निवडणूक होणार एकाच टप्प्यात! ५० टक्के आरक्षण मर्यादेचा अडसर नाही
14
आश्रम हल्ला प्रकरणातील एकमेव आरोपीची तब्बल ३४ वर्षांनंतर सुटका; काय होते नेमके प्रकरण?
15
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
16
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
17
डोंबिवलीत पाच वर्षांनंतर पुन्हा गुलाबी रस्ता; प्रदूषणाचा मुद्दा ऐरणीवर
18
चार्टर्ड प्लेनमधील 'त्या' प्रवासामुळे भाजपच्या नेत्यांना वरिष्ठांचे फटके!
19
दिसते तसे नसते... म्हणूनच जग फसते! भाजप-शिंदेसेनेच्या भांडणामागचे आणि युतीमागचे 'राजकारण'
20
गायत्री दातारच्या आयुष्यात हिरोची एन्ट्री! अभिनेत्रीने गुपचूप केला साखरपुडा, फोटो समोर
Daily Top 2Weekly Top 5

दंडाचा निधी नाशिक मनपा कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठी खर्च करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 15:08 IST

नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या आरोग्य नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्यातून मिळणारा निधी हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या उपचारासाठी खर्च करावा अशी मागणी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देम्युनिसीपल कर्मचारी सेनेची मागणीसध्या पोलीस कल्याणासाठी मिळतेा निधी

नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सध्या आरोग्य नियमांचे उल्लंघन न करणाऱ्यांच्या विरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येत असून त्यातून मिळणारा निधी हा महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांच्या उपचारासाठी खर्च करावा अशी मागणी म्युनिसीपल कर्मचारी कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. 

म्युनिसीपल कर्मचारी सेनेने यासंदर्भात आयुक्त कैलास जाधव यांना निवेदन दिले आहे. शहरात सध्या कोरेाना संसर्ग वाढत असून नागरीक आराेग्य नियमांचे उल्लंघन करताना आढळत आहेत. त्यामुळे महापालिकेने मास्क न लावणाऱ्या आणि सार्वजनिक थुंकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्याच्या अनुसार दंडात्मक कारवाईचे अधिकार महापालिकेचे स्वच्छता निरीक्षक, विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि अन्य अधिकारी वर्गाला दिले आहेत. त्याच प्रमाणे महसूल विभाग आणि पोलीसांना देखील अधिकार दिले आहेत. आदेशातच पेालीस आयुक्त कैलास जाधव यांनी पोलीसांनी वसुल केलेला दंड पेालीस कल्याण निधीत वापरण्याची तरतूद केली आहे. मात्र, नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वसुल केलेला दंड मात्र मनपा कर्मचाऱ्यांसाठी वापरण्याची तरतूद केलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर म्युनिसीपल कर्मचारी सेनेचे अध्यक्ष प्रविण तिदमे आणि सरचिटणीस राजेंद्र मोरे यांनी ही मागणी केली आहे. 

कोरोनाच्या विरोधात लढताना नाशिक महापालिकेच्या कर्मचारी स्वत: बाधीत होत आहेत. तसेच त्यांचे कुटूंबिय देखील बाधीत होत आहेत. त्यांच्या उपचारावर मोठ्या प्रमाणात खर्च होत अनेकांकडे पुरेशी रक्कम खर्च करण्यास नसल्याने त्यांने हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर म्युनिसीपल कर्मचारी सेनेने ही मागणी केली आहे.

महापालिकेच्या घन कचरा विभागातील एका ४३ वर्षीय कर्मचाऱ्याला कोरोना संसर्ग झाल्यानंतर केवळ व्हेंटीलेटर बेड न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाला. त्यापार्श्वभूमीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी ऑक्सीजन किंवा व्हेंटीलेटर बेड राखीव ठेवावे अशी मागणीही म्युनिसीपल कर्मचारी सेनेने केली आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcorona virusकोरोना वायरस बातम्या