नाशिक : मागील काळातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केले तसेच सहकार्य मला केल्यास निश्चितपणे आलेल्या निधीचा शंभर टक्के खर्च करता येईल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी मिल्ािंद शंभरकर यांनी व्यक्त केली. आपल्या काळात ग्रामसेवकांनी पदरमोड करून चांगले काम उभे केले, आताही तशीच भावना ठेवा, अशी अपेक्षा विभागीय उपआयुक्त सुखदेव बनकर यांनी व्यक्त केली. निमित्त होते, ग्रामसेवक संघटनेच्या निरोप समारंभाचे.शुक्रवारी (दि. १९) दुपारी तिडके कॉलनी येथील जिल्हा ग्रामसेवक भवनात नाशिक जिल्हा ग्रामसेवक युनियनच्या वतीने माजी मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील गायकवाड यांचा निरोप समारंभ तर मुख्य कार्यकारी अधिकारी मिल्ािंद शंभरकर यांच्यासाठी स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हाध्यक्ष कैलास वाकचोैरे यांनी मार्च अखेर जवळ आल्याने ग्रामसेवकांनी आलेला निधी संपूर्ण शंभर टक्के खर्च करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले, तर सत्काराला उत्तर देताना मिल्ािंद शंभरकर यांनी सांगितले की, मागील काळातील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जसे सहकार्य केले, तशाच सहकार्याची आपल्याला अपेक्षा आहे. तर निरोपाला उत्तर देताना सुकदेव बनकर यांनी सांगितले की, आपल्या काळात दोन सिंहस्थांचे काम झाले. त्र्यंबकेश्वर येथे अपंगासाठी केलेल्या कार्याचे केंद्रीय मंत्र्यांनी कौतुक केले. या कार्यक्रमासाठी ग्रामसेवकांनी पदरमोड करून अपंगांची ने-आण केली, त्याचे त्यांनी कौतुक केले, तर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनील गायकवाड यांनी सांगितले की, आपल्याला सिंहस्थात काम करण्याचा योग आला; मात्र अल्प काळात बदली झाली, आपण पुन्हा लवकरच नाशिकला येऊ, असे स्पष्ट केले. सूत्रसंचालन सरचिटणीस रवींद्र शेलार यांनी केले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, प्रतिभा संगमनेरे,उद्धव खंदारे, कार्यकारी अभियंता चंद्रशेखर वाघमारे, गटविकास अधिकारी राहुल रोकडे, आनंद पिंगळे, रत्नाकर पगार आदि उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामसेवक संघटनेचे के.डी. गायकवाड, केशव इंगळे, प्रमोद ठाकरे, सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)
मार्चअखेर करा ‘शंभर’ टक्के खर्च
By admin | Published: February 19, 2016 10:44 PM