नाशिक - नाशिककरांना स्पाईस जेटने मेाठा धक्का दिला. आज दुपारी पाऊण वाजता निघणारे विमान तब्बल दीड दोन तास विलंबाने झेपावले. मात्र,दिल्लीत गेल्यानंतर विमानातून प्रवाशांचे लगेच न आणता त्यांना बेेल्टवर पाठविण्यात आले. नंतर सामान आलेच नसून ते स्वतंत्र विमानाने पाठविण्यातयेणार असल्याचे आणि बुधवारी (दि. २६) मध्यरात्री सामान देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आल्याने आणखीनच गोंधळ उडाला. रात्री पोलिसांकड तक्रार करण्यात आल्यानंतर एअरपोर्टवर गोंधळ निस्तरण्याचे प्रयत्न झाले. तर दुसरीकडे कंपनीने प्रवाशांना दीड हजार रुपयांची नाममात्र मदत राहण्या-खाण्यासाठी दिली.
ओझर विमानतळावरून दुपारी १२:४५ वाजता स्पाईस जेटचे विमान झेपावणार होते. मात्र, दुपारी सव्वा दोन वाजता ते झेपावले. या विमानात १६६ प्रवासी होते. मात्र, विमान स्पाईस जेटचे नव्हते तर कोरंडेन एअरलाईनचे हायर केलेले विमान होते. मुळातच ते विलंबाने निघाले आणि दिल्लीत साडेतीन वाजतापोहोचल्यानंतर लगेजसाठी आठ क्रमांकाच्या बेल्टवर जाण्याची सूचना करण्यात आली. त्यानुसार प्रवासी तेथे गेले, मात्र लगेज येत नव्हते. चौकशीअंतीप्रवाशांचे लगेज या विमानाने आलेच नसल्याचा धक्कादायक प्रकार सांगण्यात आल्याने प्रवाशी सर्द झाले.मध्यरात्री हे सामान पोहचेल तोपर्यंत जेप्रवासी जेथे जात असतील तेथे त्यांना जाता येईल तेथे असतील त्या ठिकाणी त्यांना सामान पोहोचविण्यात येईल, असे सांगण्यात आले. मात्र, प्रवासीरात्री उशिरापर्यंत तयार नव्हते.