नाशिक : शहरातील निखिल कुळकर्णी या १५ वर्षाच्या विद्यार्थ्याला या वर्षाची स्पिरिट ऑफ
रामानुजन फेलोशिप प्राप्त झाली असून तो फेलोशिपच्या माध्यमातून तो संगणक विज्ञान आणि गणित विषयात संशोधन करणार असल्याची माहिती त्याचे वडील हेमंत कुळकर्णी यांनी दिली आहे.
निखिल कुळकर्णी याने भारतीय गणित ऑलिम्पियाडमध्ये तसेच अनेक इतर गणितीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून त्याला गणित शिकवण्याचीही आवड आहे. त्याच्या इतर आवडींमध्ये खगोलशास्त्र, जैव तंत्रज्ञान, आणि स्पर्धात्मक वादविवाद यांचा समावेश आहे.
ही फेलोशिप मिळवणारा निखिल हा केवळ दहावा भारतीय विद्यार्थी असून गणितात आणि विज्ञानामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व संशोधनात रुची असणाऱ्या जगभरातील ६० विद्यार्थ्यांना आजपर्यंत ही प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. निखिल त्याला मिळालेल्या स्कॉलरशिपचा वापर डॉ. राजीव गांधी यांच्या सोबत रँडमाइज्ड अल्गोरिदम शिकण्यासाठी तसेच त्यासंबंधी संशोधनासाठी वापरणार असल्याचे हेमंत कुळकर्णी यांनी सांगितले. दरम्यान, निखिलचे शालेय शिक्षण सिम्बाॅयसिस स्कूलमध्ये झाले असून शाळेतील शिक्षकांसह त्याला खासगी संस्थांच्या शिक्षकांचेही मार्गदर्शन मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
इन्फो-
काय आहे रामानुजन फेलोशिप
थोर भारतीय गणित तज्ज्ञ रामानुजन यांच्या सन्मानार्थ, स्पिरिट ऑफ रामानुजन (स्टेम) टॅलेंट इनिशिएटिव्ह द्वारे उदयोन्मुख अभियंते, गणितज्ज्ञ आणि वैज्ञानिकांना आर्थिक अनुदान आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संशोधकांना
जगभरातील संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा स्वीकृत प्रायोजकांसह वैयक्तिक संशोधन करण्यासाठी ५ हजार डॉलर्स पर्यंतची शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.
===Photopath===
100621\10nsk_35_10062021_13.jpg
===Caption===
निखिल कुळकर्णी