श्री वर्धमान श्रमणसंघीय स्थानकवासी जैन श्रवण संघात चातुर्मास कालावधीत सहा ते सात साध्वी गुरुमहाराजांचे आगमन झाले आहे. यात दैनंदिन आनंद भवन येथे प्रवचन सुरू आहे. यावेळी महासाध्वी यांनी आपल्या प्रवचनात मानवी आयुष्यात वेळेला महत्त्व देणे, समयसूचकता, राग, लोभ, यावर भाष्य केले तर धर्म जागरण, मानवतेचा संदेश, परोपकारी वृत्ती, दानशूरता आदींचा योग्य वापर केल्यास जीवन सफल होते. तसेच तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहावे यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते तर अहिंसा परमो धर्मचे आचरण करावे, असा उपदेश केला. शहरात आनंद भवनातील सभागृहात सकाळी दररोज प्रवचने होणार आहेत. याप्रसंगी इतर साध्वीसह जैन श्रावक संघाचे संघपती अनिल लोढा, उपसंघपती राजेंद्र ओस्तवाल, विनोद गुगळे, महामंत्री बालचंद छाजेड, पारस बाफना, सुशील नहार, नवीन मुनोत अन्य सदस्यांसह समाजातील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यात्मिक जीवन हीच सुखी संसाराची गुरुकिल्ली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 4:15 AM