शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
2
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
3
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
4
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
5
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
6
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
7
डायलॉग, टाळ्या, शिट्ट्या आणि पैसा वसूल! कसा आहे शरद केळकरचा ‘रानटी’? वाचा Review
8
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
9
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
10
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...
11
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
12
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
13
जिओची धमाकेदार ऑफर, 50 दिवसांपर्यंत मिळेल सुपरफास्ट इंटरनेट!
14
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
15
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
16
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
17
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
18
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
19
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
20
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन

जीवनात आनंदप्राप्तीसाठी आध्यात्माची गरज : देखणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:48 AM

अनेकजण सुख व आनंदप्राप्तीसाठी पैसा मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लाखोंच्या संख्येने काम करणारे लोक आहे. त्यांना चांगल्या पैशासोबत गाडी, बंगला व अन्य सुख सुविधांही मिळतात, परंतु त्यांनी ते सुखी होत असले तरी त्यांना आनंद मिळतोच असे नाही.

नाशिक : अनेकजण सुख व आनंदप्राप्तीसाठी पैसा मिळविण्यासाठी धडपड करीत असतात. कॉर्पोरेट कंपन्यांमध्येही लाखोंच्या संख्येने काम करणारे लोक आहे. त्यांना चांगल्या पैशासोबत गाडी, बंगला व अन्य सुख सुविधांही मिळतात, परंतु त्यांनी ते सुखी होत असले तरी त्यांना आनंद मिळतोच असे नाही. जीवनात अधिक पैसा व श्रीमंती मिळाली म्हणजे आनंदाची प्राप्ती होऊ शकेल असे नाही, तर जीवनात खऱ्या अर्थाने सुख व आनंद मिळवायचा असेल तर अध्यात्माची गोडी लावली पाहिजे, असे मत युवा व्याख्याते भावार्थ देखणे यांनी व्यक्त केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेत सोमवारी (दि.२८) डॉ. देखणे यांनी पुष्प गुंफले. दिवंगत डॉ. विष्णू महादेव गोगटे यांच्या स्मृतीत ‘कॉर्पोरेट कर्मयोग’ विषयावर व्याख्यान देताना देखणे यांनी कॉर्पोरेट जगात काम करतानाही आधात्माचा कानमंत्र उपस्थिताना दिला, ते म्हणाले, अनेक व्यक्ती जीवनात मोठ्या प्रमाणात पैसा मिळवून सर्व सोयी-सुविधा विकत घेतात. परंतु त्यातून त्यांना खरे आत्मसुख तथा आनंद मिळत नाही. याऊलट कामाचा तणाव, वेळेचा अभाव, संघर्ष आणि आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आध्यात्मच सुख मिळवून देते. तसेच आध्यात्माच्या माध्यमातून आपण जे काम करतो त्यातही आनंदही निर्माण होतो. म्हणूच आजच्या कॉर्पोरेट युगात कर्म करत असताना त्याला आध्यात्माचीही जोड देण्याची गरज असल्याचे मत देखणे यांनी मांडले.आजचे व्याख्यान , वक्ते : लक्ष्मीकांत देशमुख ,  विषय : उच्च शिक्षणाची गुणवत्ता-एक मोठे प्रश्नचिन्ह

टॅग्स :Nashikनाशिक