सायखेडा : गोदाकाठ भागातील अनेक गावांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करंजगाव, चांदोरी, औरंगपूर, म्हाळसाकोरे, चापडगाव या गावांत चार दिवसांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या गावांतील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत स्तरावर दिल्या आहेत. आजूबाजूच्या सायखेडा, भेंडाळी, औरंगपूर, करंजगाव या गावांनी स्वयंस्फूर्तीने पाच ते सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू असतील, असा ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि सदस्य यांनी निर्णय घेतला आहे.या निर्णयाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे. आजूबाजूच्या गावातील व्यवसाय बंद असल्यामुळे नागरिक दुसऱ्या गावात वस्तू खरेदीसाठी जातात, पर्यायाने संक्रमण होऊन रुग्णांची संख्या वाढत आहे, दुसऱ्या गावातील ग्राहक कुठून आले, कोणाच्या संपर्कात आले होते, याची माहिती मिळत नाही. त्यामुळे गावातील सर्वच व्यवसाय बंद करून साखळी तुटावी याकरिता हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.ग्रामीण भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गावात दुकाने सुरू असल्यामुळे इतर नागरिक ये- जा करतात. त्यामुळे प्रादुर्भाव वाढत आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने आठ दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.- भारती चव्हाण, सरपंच, औरंगपूर.
गोदाकाठ भागात स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 12:00 AM
सायखेडा : गोदाकाठ भागातील अनेक गावांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. करंजगाव, चांदोरी, औरंगपूर, म्हाळसाकोरे, चापडगाव या गावांत चार दिवसांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या गावांतील प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना ग्रामपंचायत स्तरावर दिल्या आहेत. आजूबाजूच्या सायखेडा, भेंडाळी, औरंगपूर, करंजगाव या गावांनी स्वयंस्फूर्तीने पाच ते सात दिवसांचा जनता कर्फ्यू लागू केला आहे. या काळात केवळ अत्यावश्यक सुविधा सुरू असतील, असा ग्रामपंचायत स्तरावर सरपंच आणि सदस्य यांनी निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्देसात दिवस आरोग्यसेवा वगळता अनेक गावांत पूर्णत: बंद