खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खर्डे गावाने मंगळवारपासून सहा दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला असून ,याला सर्व छोट्या मोठ्या दुकानदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे . कोरोनाने जवळपासच्या तालुक्यात प्रवेश केल्याने याची दहशत पसरल्याने खर्डे (वा) गावाने लॉकडाऊन संपेपर्यंत सीमा बंदीचा निर्णय घेतला आहे . याचा वाढता फैलाव लक्षात घेऊन अधिक सतर्क रहाण्याचा आणि आपल्या तालुक्यात व गाव ,परिसरात याचा शिरकाव होऊ नये म्हणून खर्डे गाव सहा दिवस संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला . गावात दवंडी देऊन व ध्वनिक्षेपक तशा प्रकारचे आवाहन देखील करण्यात आल्याने पहिल्या दिवशी या जनता कर्फ्यूला प्रतिसाद मिळाल्याने सर्वत्र बंद व शुकशुकाट दिसून आले. या काळात फक्त दवाखाने , मेडिकल ही अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करु न देण्यात आली आहेत. यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर पडू नये व दिलेल्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी , याचे जो कोणी उल्लंघन करील त्यांच्याकडुन दंड व कारवाई करण्यात येईल . कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कोणीही घराबाहेर पडू नये , यासाठी नागरिकांनी आरोग्य विभागाला ग्रामपंचायत प्रशासन व सामाजिक कार्यकर्त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन रूग्णसेवक कृष्णा जाधव यांनी केले आहे .
खर्डे गावात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 6:28 PM