अंदरसूल : ग्रामपलिकेच्या वतीने गावात जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली. यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी घ्यावयाची खबरदारी यावर ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात आशा स्वयंसेविकांना मास्क व हात धुण्यासाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते गणेश कासार, ग्रामपालिकेचे किरण बनकर, दादा नाईकवाडी आदी उपस्थित होते.
अंदरसूल येथे जंतुनाशक औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 5:24 PM