मालेगाव : शहरामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्रात मनपा आयुक्तांनी १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून कोरोना बाधितांच्या कुटुंबियांना संशयित म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या हॉलमध्ये हलविण्यात आले आहे़मालेगावी बुधवारी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह येऊन त्यात एकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली़ त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून युद्धपातळीवर संबंधित कोरोनाबाधितांच्या निवास स्थान असलेल्या गुलाबपार्क, कमालपुरा, मोमीनपुरा व मदीनाबाद या क्षेत्रात नियमित स्वच्छता बरोबरच सोडियम हायपोक्लोराईड या कीटकनाशकाचे द्रावण तयार करून मोठ्या प्रमाणात फवारणी करण्यात येत आहे. यासाठी प्रत्यक्षात मनपा आरोग्य अधिकारी डॉ. सपना ठाकरे, डॉ. भीमराव त्रिभुवन, आणि मनपाचे इतर वरिष्ठ अधिकारी संबंधित भागात जाऊन अग्निशमन वाहने, ट्रॅक्टर व नवीन आणलेल्या फवारणी मशीनमार्फत फवारणी व धुरळणी करीत आहेत. महापालिकेने स्वच्छते सह फवारणी व धुरळणी वर सर्वाधिक भर दिला आहे. वरील भागाव्यतिरिक्त सामान्य रुग्णालय, मदिनानगर क्वारंटाइन दवाखाना, जीवन हॉस्पिटल येथे फवारणी करण्यात येणार आहे. याशिवाय नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे.महापालिकेमार्फत कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या सर्व रुग्णांच्या संपूर्ण कुटुंबियांना संशयित म्हणून महापालिकेच्या कलीम दिलावर हॉल येथे सक्तीने हलविण्यात आले असून त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था करण्याबरोबरच वैद्यकीय व इतर आवश्यक सुविधा पुरवण्यिात आली आहे. त्याचबरोबर मनपाने अधिग्रहीत केलेल्या जीवन हॉस्पिटल येथे सोडियम हायपोक्लोराइड द्रावणाच्या फवारणीने निर्जंतुकीकरण करून रुग्णांसाठी सर्व अत्यावश्यक अद्ययावत सुविधांसह तज्ज्ञ डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नागरिकांनी घरातच राहावे, स्वत:ची काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात, कोणत्याही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. महापालिका, पोलीस व महसूल प्रशासन व त्यांचे शासकीय कर्मचारी यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त किशोर बोर्डे यांनी केले आहे.कोरोनाबाधितांचा निवासस्थान परिसर सीलमालेगाव मध्य : शहरात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या निवासस्थानांचा परिसर पोलिसांनी सिल केला असुन रहिवाशांना प्रशासनातर्फे आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह यांनी पत्रकार परिषदेत दिली. शहरातील पाच जणांचा बुधवारी रात्री कोरोनाचा पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतर प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाधितांच्या निवासस्थान असलेले मोमीनपुरा गुलाबपार्कव मदिनाबाद हा परिसर १४ दिवसासाठी सील करण्यात आला आहे. सील करण्यात आलेल्या भागाची डॉ. आरती सिंह यांनी पाहणी केली. सील करण्यात आलेल्या भागातील नागरिकांसाठी जीवनावश्यक सेवा त्याच ठिकाणी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेजेस टाकणाऱ्या विरोधात चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संचारबंदीचे उल्लंघन केल्यास कारवाईस सामोरे जावे लागेल, असा इशारा सिंग यांनी दिला.
मालेगावी कोरोनाबाधितांच्या भागात औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2020 11:31 PM
शहरामध्ये कोरोणा पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संबंधित क्षेत्रात मनपा आयुक्तांनी १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश निर्गमित केले असून कोरोना बाधितांच्या कुटुंबियांना संशयित म्हणून घोषित केल्यानंतर त्यांना महापालिकेच्या हॉलमध्ये हलविण्यात आले आहे़
ठळक मुद्देप्रशासकीय यंत्रणा सतर्क : बाधितांच्या कुटुंबियांचे मनपाच्या सभागृहात अलगीकरण