लोकमत न्यूज नेटवर्कइंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.प्रभाग ३० मधील राजीवनगर, अमृत वर्षा कॉलनी, पाटील गार्डन, महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, रथचक्र सोसायटी, शिव कॉलनी, पांडव नगरी, रंगरेज मळा यांसह परिसरात कोरोना प्रतिबंधित औषध फवारणी करण्यात आली. परिसरात स्वच्छता पाळावी आणि घराच्या बाहेर निघू नये, असे आवाहन करण्यात आले. याप्रसंगी मनपा सभागृह नेता सतीश सोनवणे, आरोग्य सभापती डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेवक अॅड. श्याम बडोदे, स्वच्छता विभागीय निरीक्षक सुनील शिरसाठ यांसह आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.महाजननगर, ओम कॉलनी, एकदंतनगर परिसरनाशिक : कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सिडको परिसरातील कॉलनी आणि वसाहतींमध्ये महानगरपालिकेच्या वतीने औषध फवारणी करण्यात येत आहे. मंगळवारी (दि.३१) महाजननगर, ओम कॉलनी, एकदंतनगर, मोरे मळा, इंद्रप्रस्थ कॉलनी तसेच अंबड शिवारातील नववसाहतींमध्ये औषध फवारणी करण्यात आली. यावेळी सदर भागातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी नगरसेवकांकडे कचरा, गटारीचे पाणी, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्या मांडल्या.
शहर परिसरात औषध फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2020 10:30 PM
इंदिरानगर : प्रभाग क्र मांक ३० मध्ये कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आली.
ठळक मुद्देनागरिकांनी नगरसेवकांकडे कचरा, गटारीचे पाणी, डासांचा प्रादुर्भाव आदी समस्या मांडल्या.