सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदारांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर,जायखेडा या सारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.सध्या संपूर्ण देशात कोरोना संसर्गाने धुमाकूळ घातलेला आहे. मात्र कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केंद्र शासन आणि महाराष्ट्र सरकारने गेल्या २२ मार्चपासून देशात संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर आमदार दिलीप बोरसे यांनी सोमवारपासून सटाणा शहरासह नामपूर, जायखेडा येथे स्वखर्चाने सोडियम हायपोक्लोराईड या औषधाची फवारणी सुरू केली आहे.दरम्यान तालुक्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता आमदार बोरसे यांनी औषध फवारणी मोहीम सुरू केली आहे. गावातील सरपंच उपसरपंच सदस्यांसह ग्रामस्थांनीही या मोहिमेचे स्वागत करत मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे.अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त शक्यतो घराबाहेर पडू नये, बाहेर पडताना तोंडाला मास्क किंवा रु माल बांधावा, समोरच्या व्यक्तीशी बोलताना लांब अंतरावरून बोलावे, घरात गरम केलेले कोमट पाणी प्यावे, खोकला किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवल्यास त्विरत संबंधित डॉक्टरांशी संपर्क करावा असे आवाहन त्यांनी केले.या औषध फवारणी मोहिमेत आमदार बोरसे यांच्यासमवेत बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे-पाटील पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, त्यांचे सहकारी पाटील, जिल्हा परिषद माजी सदस्य पप्पू बच्छाव, साहेबराव सोनवणे, राहुल सोनवणे, काकाजी सोनवणे, विकी सोनवणे, योगेश सूर्यवंशी, रूपाली पंडित, अनिल पाकळे, ज्योती ठाकरे, सुवर्णा देवरे आदी सहभागी झाले होते.(फोटो ३० सटाणा)सटाणा शहरासह तालुक्याततील प्रत्येक गावात सोमवारपासून आमदार दिलीप बोरसे यांच्या स्वखर्चातून औषध फवारानी तहसिल कचेरीपासून सुरूवात केली. यावेळी उपस्थित आमदार दिलीप बोरसे समवेत तहसिलदार जितेंद्र इंगळे पाटील, नंदकुमार गायकवाड,साहेबराव सोनवणे, महेश देवरे,निर्मला भदाणे, राहूल सोनवणे, अनिल पाकळे, रूपाली पंडीत, मुन्ना भामरे, शामकांत लोखंडे, रविंद्र खैरनार आदी.
बागलाणमध्ये कोरोना रोखण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:52 PM
सटाणा : कोरोनाचा संसर्ग प्रतिबंधित करण्यासाठी बागलाणचे आमदारांनी स्वखर्चाने बागलाण तालुक्यातील सटाणा, नामपूर,जायखेडा या सारख्या दाट लोकवस्तीच्या गावांमध्ये सोडियम हायपोक्लोराईड या प्रभावी औषधाच्या फवारणी मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
ठळक मुद्दे मोहीम प्रभावीपणे राबविण्याचा संकल्प केला आहे.