दरेगाव : चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील काढणी आलेल्या कांद्यात टू-फोर-डी तणनाशक औषधाची फवारणी करून कांदा पीक खराब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.संबंधित शेतकऱ्याचे सुमारे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी संजय दामू जाधव यांच्या एक एकर कांद्याच्या शेतात अज्ञात व्यक्तीने गव्हाच्या पिकांवर वापरले जाणारे तणनाशक टू-फोर-डी या औषधांची फवारणी करत रात्रीच्या वेळी अंधाराचा फायदा घेत कांदा पिकांची नासाडी केली.दरेगाव येथे जाधव यांचे दरेगाव-निमोण रस्त्यालगत शेती आहे.जाधव यांनी दरेगाव येथील रहिवासी उत्तम खरात यांना कांदापीक वाट्याने करण्यासाठी एक एकर शेती करायला दिली होती.गट नंबर २०१/१ शेतामध्ये कांदा लागवड करण्यासाठी बाहेरगावहून महागडे रोप विकत घेऊन एक एकर कांद्याची लागवड केलेली असताना सध्या कांदा चांगला तेजीत असताना रोजच्या ढगाळ वातावरणात या शेतकऱ्यांनी कांदा पिकांची निगा ठेवली.महागडी औषधाची फवारणी केली. महागडे रोप, मजुरी असा ३० ते ४० हजार रुपये खर्च केला होता. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला आहे. आठ दिवसांत काढणी आलेला कांदा अज्ञात व्यक्तीने गव्हासाठी वापरले जाणारे औषधाची जाधव यांच्या कांद्यावर फवारणी केल्याने संपूर्ण कांदे खराब होऊन फुटत आहे. जाधव व खरात या शेतकºयांना उत्पन्नही चांगले होऊन दोन रु पये पदरात पडले असते, परंतु या कांद्यावर अज्ञाताने फवारणी केल्याने कांदे आडवे पडून फुटत आहे व कांद्याचे नाळ तुटत असून, कांदे उपटले असता कांद्याचे मूळ जमिनीत राहून कांदे अर्धवट फुटून निघत आहे. यावर गव्हाच्या पिकांवर वापरले जाणारे टू-फोर-डी औषधाची फवारणी मारल्याचे जानकाराचे मत आहे. अशा अज्ञात माथेफिरू व्यक्तीने नुकसान केल्याने या घटनेमुळे परिसरातील कांदा उत्पादक शेतकºयांमध्ये खळबळ उडाली आहे. औषध मारणाºयांचा घेण्याची मागणी केली जात आहे.शेतकºयांवर विविध प्रकारची संकटेउन्हाळ कांद्याच्या बियाणांचे वाढलेले दर व रोपांच्या तुटवड्यामुळे शेतकºयाने गहू व मका पिकाची लागवड केली आहे. त्यामुळे यावर्षी मका व गव्हाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. त्याचबरोबर काही शेतकºयांनी भाजीपालावर्गीय पिकाची लागवड केलेली आहे. ढगाळ व धुक्याच्या वातावरणामुळे कांद्याचे पीक पिवळे पडून त्यांच्यावर मावा व करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसू लागला आहे. त्यामुळे कांदापिकावर महागडी औषधांची फवारणी करीत आहे, अशा परिस्थितीत शेतकºयांवर संकटे येत आहेत.
कांदा पिकावर तणनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 10:45 PM
चांदवड तालुक्यातील दरेगाव येथे अज्ञात माथेफिरूने शेतातील काढणी आलेल्या कांद्यात टू-फोर-डी तणनाशक औषधाची फवारणी करून कांदा पीक खराब झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ठळक मुद्देएक एकराचे नुकसान : दरेगावला अज्ञात व्यक्तीचा खोडसाळपणा