पिळकोस : कळवण तालुक्यातील चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या टमाटा रोपावर अज्ञात माथेफिरूने रात्रीतून तणनाशक फवारणी करून रोपाचे पूर्णत: नुकसान केल्याने संताप व्यक्त होत आहे.चाचेर येथील शेतकरी राजेंद्र कडू भामरे यांच्या लागवडीवर आलेल्या टमाटा रोपावर अज्ञात माथेफिरूने रात्रीतून तणनाशक फवारणी करून टमाटा रोपाचे पूर्णत: नुकसान केल्याने शेतकरी भामरे यांचे नुकसान झाले असून या प्रकाराबाबत परिसरातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे. भामरे हे अल्पभूधारक शेतकरी असून ते भाजीपाला पिकाची शेती करतात. त्यांनी त्यांच्या शेतात टमाटा रोपाची लागवड केली होती. त्यांच्याकडील शेतातील रोप हे वीस दिवसांचे झाले होते व ते त्या रोपाची शेतात लागवड करणार होते. टमाटा लागवडीसाठी त्यांनी शेत मशागत करून, शेणखत टाकून सरी पडून, पेपर आंथरून व ठिबक पसरवून तयार ठेवले होते. सकाळी ते शेतात गेले असता त्यांनी त्याच्या शेतातील रोपे पूर्णत: खराब झालेले दिसून आली. झालेला प्रकार त्यांना लक्षात आला. त्यांनी जवळ राहणाºया सर्व शेतकºयांना बोलावून झालेले रोपाचे नुकसान निदर्शनास आणून दिले. यावेळी शेतकºयांनी त्यांना धीर देत लागवडीसाठी आता तुम्ही दुसरीकडे विकत रोपे आणून लागवड करून घेण्याचा सल्ला दिला.कळवण तालुक्यात आता असे प्रकार बºयाचदा झाले असून चाचेर गावात मात्र असा प्रकार कधीच घडलेला नसून, काही गावात कांदा चाळीत युरिया टाकणे असे प्रकार ऐकावयास मिळतात. सदर झालेला प्रकार लाजिरवाणा व निंदनीय असून, यापुढे शेतकºयांना शेती करताना फारच सावधानता बाळगावी लागेल. झालेल्या प्रकारामुळे शेतकरी बांधवांनी धसका घेतला आहे.माझे शेत हे घरापासून थोडे लांब असून रात्रीचा फायदा घेऊन अज्ञात माथेफिरूने माझ्या टमाटा रोपावर तणनाशक फवारणी करून हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. यापुढे माझ्यासारख्या गरीब शेतकºयाला असा त्रास होऊ नये यासाठी मी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.- राजेंद्र कडू भामरे, शेतकरी
टमाटा रोपावर तणनाशक फवारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 11:50 PM
कळवण तालुक्यातील चाचेर येथील एका शेतकऱ्याच्या टमाटा रोपावर अज्ञात माथेफिरूने रात्रीतून तणनाशक फवारणी करून रोपाचे पूर्णत: नुकसान केल्याने संताप व्यक्त होत आहे.
ठळक मुद्देअज्ञात माथेफिरूचे कृत्य : कोरोनात लाखोंचे आर्थिक नुकसान